Social Media  Saam tv
महाराष्ट्र

Social Media Users : पालकांनो सावधान! तुमची मुलंही सोशल मीडिया वापरत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी

Social Media : नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडियावरील हिंसक रिल्समुळे गुन्हे वाढले असून पोलिसांनी पालकांवर व मार्गदर्शकांवर कारवाईचा इशारा दिला आहे. पोलिसांनी सोशल मीडियावर लक्ष ठेवत कठोर पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

Alisha Khedekar

सोशल मीडियावर अनेकदा तरुण मंडळी हातात बंदूक आणि हत्यार घेऊन रिल्स बनवताना दिसतात. अशा प्रकारे व्हिडिओ बनवणाऱ्या तरुण मंडळींवर आता पोलिसांचं लक्ष असणार आहे.नाशिक शहरात सोशल मीडियावरील रिल्स वॉरमुळे गुन्हे वाढीस लागले आहेत. दरम्यान आता सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांमध्ये सुरु असलेल्या रिल वॉरमधून वाढत असलेल्या गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी आता पोलिसांनी अशा रिल वॉर करणाऱ्या घटनेतील मुलांच्या पालकांवरच कारवाईचा इशारा दिला आहे.

सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांमध्ये सुरु असलेल्या रिल वॉरमधून वाढत असलेल्या गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी आता पोलिसांनी अशा रिल वॉर करणाऱ्या घटनेतील मुलांच्या पालकांवरच कारवाईचा इशारा दिला आहे. एवढेच नव्हे तर रिल टाकणाऱ्या मुलांचे मार्गदर्शक, भाई, दादा, बॉस यांच्यावरही आता गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात हाणामाऱ्या, तोडफोड, दहशत माजवण्याचा घटनांमध्ये वाढ झाली असून यात अल्पवयीन मुलांचा समावेश वाढल्याचं समोर आलं आहे.

अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांमध्ये वाढता सहभाग लक्षात घेता ही चिंतेची बाब बनली असून यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. शहरातील काही गुन्हे हे सोशल मिडियावरील अल्पवयीन मुलांच्या रिल वॉरमुळे झाल्याचं देखील समोर आलं आहे.

त्यामुळे सायबर पोलिसांना सोशल मिडियावरील अल्पवयीन मुलांच्या रिल वॉरवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. अल्पवयीनांचे मार्गदर्शक कोण? तो कोणाचा समर्थक? कोणत्या भाई दादाचा त्याला पाठिंबा आहे का? याचा देखील कसून तपास केला जाणार असून तसं निष्पन्न झाल्यास सुरुवातीला समज आणि नंतर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तर पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष देण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं असून अन्यथा गुन्हेगारी कारवायांमधील पालकांवर देखील कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पतंग उडवताना इलेक्ट्रिक शॉक लागून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

Bajra Bhakri Recipe: भाकरी थापायला जमत नाही? मग लाटण्याने बनवा मऊ आणि टम्म फुगणारी बाजरीची भाकरी, सोपी आहे पद्धत

Dog Killing Case : निवडणुकीतलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आठवडाभरात ५०० कुत्र्यांना ठार मारलं, अनेक गावांमध्ये खळबळ

Nail Art : ब्यूटी पार्लरसारखे नेल आर्ट करा आता घरच्या घरी, पाहा डिझाइन

Contrast Saree Blouse : साडीसोबत घाला कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज; सणासुदीला मिळेल परफेक्ट लूक, सगळेच म्हणतील WOW

SCROLL FOR NEXT