Somnath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Satara News : साताऱ्यात ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, शरद पवारांच्या दौऱ्यादरम्यान होते नियुक्त

Police Constable Dies due to Heart Attack : सोमनाथ शिंदे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.

ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा

Satara News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. शरद पवारांच्या सातारा दौऱ्यात हजारो कार्यकर्ते गाड्यांच्या ताफ्यासह त्यांच्यासोबत होते.

त्यामुळे वाहतूक पोलिसांची टप्प्याटप्यावर नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान महामार्गावर तैनात असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

सोमनाथ शिंदे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. शरद पवारांच्या दौऱ्यासाठी महामार्गावर त्यांची नियुक्त करण्यात आली होती. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने सोमनाथ शिंदे यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

सोमनाथ शिंदे हे सातारा शहर वाहतूक शाखेत कार्यरत होते. रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआगोदरच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. या घटनेने सातारा पोलीस दल शोकाकूल झालं आहे. (Latest Marathi News)

तज्ज्ञांचा सल्ला

धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये हार्टअटॅक आणि स्ट्रोकचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. स्ट्रेस, अयोग्य खानपान, खराब लाइफस्टाइल, झोप पूर्ण न होणे, दारू आणि सिगरेट या गोष्टींचे प्रमाण जास्त वाढल्याने तुम्हाला हृदयविकारासारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागू शकते.

हार्ट अटॅक आणि स्ट्रोकच्या धोक्यापासून वाचण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांवरती तुमचं लक्ष असलं पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT