बीड : प्रेषित मोहम्मद पैगंबर (prophet mohammad) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळं भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या विरोधात मुस्लिम संघटनांनी तीव्र आंदोलन केले होते. गेल्या काही दिवसांपासून नुपूर शर्मा आणि नविन कुमार जिंदाल (Naveen Kumar Jindal) यांच्या विरोधात देशभर जोरदार आंदोलन करण्यात आले. विविध ठिकाणी या दोघांविरोधात गु्न्हा दाखल करुन अटक करण्याची मागणीही जोर धरत आहे. दरम्यान, नुपूर शर्मा यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नाही. नुपूर शर्मा यांच्या विरोधात बीडमध्येही (Police FIR) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या, नुपूर शर्मा यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. एकाटीव्ही वाहिनीवरील आयोजित चर्चेत शर्मा यांनी प्रेषितांच्या विरोधात विधान केलं होतं.
शर्मा यांच्या वक्तव्यामुळं मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.त्याचबरोबर बीडसह देशभरामध्ये नुपूर शर्मा विरोधात मुस्लिम समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला होता. दरम्यान, आज बीड शहर पोलीस ठाण्यांमध्ये, नुपूर शर्मा विरोधात कलम 295 (अ), 505(2) नुसार गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी दिलीय.
Edited By - Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.