Latur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

सव्वासात लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत पर्दाफाश, औराद शहाजनी पोलिसांची कामगिरी

औराद शहाजानी पोलिसांनी मागील तीन दिवसांत चोरी व घोरपडीच्या गुन्ह्याचा तपास लावून १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहा आरोपींना अटक केलेली आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर - जिल्ह्यातील निलंगा (Nilanga) तालुक्यातील औराद शहाजानी येथील एका व्यापाऱ्याचे घर फोडून सव्वासात लाखांचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली होती. औराद पोलिसांनी (Police) या प्रकरणात दमदार कामगिरी करीत २४ तासांत घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

औराद येथील एक व्यापारी २३ जुलै रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. घरी कोणी नसल्याची संधी पाहून चोरट्यांनी दागिने व रोख असा ७ लाख २६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याप्रकरणी औराद पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांनी पथकामार्फत तपासाची चक्रे गतिमान केली.

एका गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बबलू उर्फ अमजद रजा शकील बेलोरे, सोहेल तैमूर पटेल आणि इम्रान खलीलमियाँ कासार बेलूरे यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुल केले व गुन्ह्यात चोरलेले दागिने व ५० हजार असे एकूण ७ लाख २६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल काढून दिले. औराद शहाजानी पोलिसांनी मागील तीन दिवसांत चोरी व घोरपडीच्या गुन्ह्याचा तपास लावून १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहा आरोपींना अटक केलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोणत्या भाज्यामध्ये सुकं खोबरं वापरू नये? भाजीची चव बिघडेल

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी मिळणार? ₹२००० कधी येणार? तारीख आली समोर

Nora Fatehi Accident: मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात

Navi Mumbai Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Election: भाजपची इन्कामिंग एक्सप्रेस सुसाट,पुण्याचे माजी महापौर हाती घेणार कमळ?

SCROLL FOR NEXT