nanded , police, arrests, youth Saam Tv
महाराष्ट्र

Extra Marital Affairs : लग्नानंतरही अफेअर सुरु ठेवल्याने मित्रांनीच मित्राला गच्चीवरुन दिले फेकून

पाेलिसांनी घटनेचा कसून तपास केल्याने सत्य बाहेर आले.

संतोष जोशी

Nanded Crime News : नांदेड (nanded) येथे अनैतिक संबंधातून एका तरुणाचा (youth) दोघांनी खुन केला. त्यानंतर अपघात (accident) असल्याचा बनाव केला. ही घटना (incident) शहरातील श्रीनगर येथे घडली आहे. (Maharashtra News)

राधेश्याम अग्रवाल असं खुन झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पाेलिसांनी (police) आकाश पालिमकर आणि आदिनाथ मोरे या दाेघांना संशयित म्हणून अटक (arrest) केली आहे. राधेश्याम हा गच्चीवर झोपला असताना मध्यरात्री आकाश आणि आदिनाथने चाकुने वार करून राधेश्यामला मारले. त्यानंतर अपघात दिसावा म्हणून गच्चीवरुन फेकून दिले.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालात चाकूचे घाव असल्याचे निदर्शनास आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने तपास केला असता. राधेश्याम याचे एका महिलेसोबत असलेले अनैतिक संबंध आकाश आणि आदिनाथला पसंत नव्हते. तसेच एक महिन्यापुर्वीच राधेश्यामचे लग्न (marriage) झाले होते. तरीही त्या महिलेसोबत राधेश्यामने संबध ठेवले होते.

हा राग मनात धरून आकाश आणि आदिनाथ राधेश्यामचा खुन केला. या प्रकरणी दोघां विरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT