Nashik Crime News saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : रेल्वे स्टेशनवर त्याची पडली तिच्यावर वाईट नजर, मित्राला बाेलावून केला विवाहितेवर सामूहिक अत्याचार; दाेघे अटकेत

या घटनेमुळे नाशिक शहर परिसरात खळबळ माजली.

अभिजीत सोनावणे

Nashik News : नवसारीहून बहिणीकडे आलेल्या एका विवाहितेवर चेहडी परिसरात सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेतील दोन संशयितांना पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांपैकी एक रेल्वे स्थानकावर पाणी विक्री करताे तर दुसरा रिक्षाचालक आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय विवाहिता तिच्या बहिणीला भेटण्यासाठी रेल्वेने नवसारीहून मुंबईमार्गे नाशिकला आली. बुधवारी मध्यरात्रीनंतर पहाटे अडीचच्या सुमारास ती नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उतरली. त्यानंतर सहप्रवाशाच्या मोबाईलवरून तिने बहिणीला फोन केला. पण उशीर झाला असल्याने आता येण्याची घाई करू नका, रेल्वे स्टेशनवरच थांबा असे बहिणीने तिला सांगितले.

मी सकाळी तुला घ्यायला येईन असे बहिणीने सांगितल्याने पीडितेने रेल्वे स्थानकावर थांबण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, रेल्वे स्थानकावर पाणी विकणाऱ्या कुणाल पवार याने तिला मदत करण्याच्या बहाण्याने विचारणा केली. तसेच काही खायला दिले. काही वेळाने त्याने प्रकाश मुंडे या रिक्षाचालक मित्रालाही बोलावून घेतले.

पीडितेची दिशाभूल करून दोघांनी तिला चेहाडी येथील शिव परिसरात नेले. तेथे पेरूच्या बागेत नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने पीडितेला बेदम मारहाण केली आणि कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडितेने आरडाओरडा करून तेथून पळ काढला. त्यावेळी शेजारील इमारतीतील सुरक्षा रक्षकाच्या मदतीने तिने पोलिसांपर्यंत (police) घटनेची माहिती पाेहचवली.

पाेलिसांनी पीडितेच्या तक्रारीनंतर कुणाल पवार आणि प्रकाश मुंडे यांची चाैकशी करत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. या घटनेमुळे नाशिक शहर परिसरात खळबळ माजली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबई हादरली! भररस्त्यात गोळीबाराचा थरार, एकाच्या पायात घुसली गोळी

Pune News: पुण्यातील मनोरुग्णालयात तरुणाची आत्महत्या, खिडकीला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

इंदिरा गांधींचंही सोनं न खरेदी करण्याचं आवाहन? मोदींसारखाच इंदिरा गांधींचा 1967 साली निर्णय?

आधी डोकी फोडली, आता सत्तेसाठी एकवटली? अंबरनाथ पालिकेत शिंदेसेना-भाजपची युती?

NEET UG परीक्षा रद्द, आता पुढे काय? विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करून फी भरावी लागणार का?

SCROLL FOR NEXT