Latur Crime News, Pune, Youth saam tv
महाराष्ट्र

Latur News : लातूरात अपहरणकर्त्यांच्या तावडीतून विद्यार्थ्याची सुटका; पुण्यातील तीन युवक अटकेत

हे तीन युवक कपिल याच्याकडून पैसे घेण्यासाठी लातुरात का आले? त्यांना कोणी पाठवले? यात पैशांच्या देण्याघेण्याचा विषय आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.

दीपक क्षीरसागर

Latur Crime News : लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे खंडणीसाठी अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अपहरणकर्त्याच्या गाडीतून विद्यार्थ्याने स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर त्याने थेट लातूरच्या (latur) गांधी चौक पोलीस ठाणे गाठले. या प्रकाराने लातूरच्या शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ माजली आहे. (Breaking Marathi News)

लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस शिक्षण घेणारा कपिल जगन्नाथ शिवशरण हा विद्यार्थी लातूर मध्यवर्ती बस स्थानकामध्ये गावाकडे (village) जाण्यास निघाला होता. त्यावेळी तेथे एका कारमधून आलेल्या तीन जणांनी त्याला बळजबरी करत कारमध्ये बसवले. (Latur Latest Marathi News)

कार काही अंतर पुढे गेल्यानंतर कपिल याने स्वतःची सुटका करून घेत थेट गांधी चौक पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ घटनास्थळी पथक पाठवले. कार आणि तीन संशियतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कपिल शिवशरण यांच्या तक्रारीवरून गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंधरा लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी हा प्रकार केल्याची माहिती फिर्यादीत नमूद आहे. पाेलिसांनी ताब्यात घेतलेले तीन युवक पुण्यातील (pune) असल्याचे समजते.

हे तीन युवक कपिल याच्याकडून पैसे घेण्यासाठी लातुरात का आले? त्यांना कोणी पाठवले? यात पैशांच्या देण्याघेण्याचा विषय आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत फिर्यादी आणि अटकेत असलेले संशयित आरोपी काहीही बोलण्यास तयार नाहीत. फिर्यादीने सांगितलेला घटनाक्रम सीसीटिव्हीच्या माध्यमातून पडताळून पाहण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिलांमधील 'या' 5 सवयी नवऱ्याला बिलकूल आवडत नाही

Maharashtra Politics: ठाकरेसेना अन् काँग्रेसला खिंडार, बड्या नेत्यासह १५० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सोडली साथ

Kalyan Dombivli : कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी संकट! 'या' भागांत पाणी पुरवठा राहणार बंद ; वाचा A to Z माहिती

Samantha Ruth Prabhu: ३९ व्या वर्षी अभिनेत्री होणार आई, समंथाने चाहत्यांसोबत शेअर केली प्रेग्नन्सीची गोड बातमी

Maharashtra News Live Update: अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे प्रकाश साबळे यांचा रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षात पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT