Street Dogs Attack In Pimpri Chinchwad : भटक्या कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला; आजही पिंपरी चिंचवड महापालिका ढिम्मच

शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Pimpri Chinchwad
Pimpri Chinchwadsaam tv

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडच्या संत तुकारामनगर परिसरातील एका सहा वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला करत चावा घेतला आहे. या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. (Maharashtra News)

Pimpri Chinchwad
Pune Breaking News : जंगली महाराज राेडवरील 'त्या' प्रकारानंतर मस्तवाल पुणेकरावर गुन्हा दाखल (पाहा व्हिडिओ)

मोहम्मद शेख असं कुत्र्याच्या (stray dogs) हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. कुत्र्याने त्याच्या डाव्या हाताला तीन ठिकाणी कडाडून चावा घेतला. सुदैवाने परिसरातील नागरिकांनी कुत्र्याला हुसकावून लावल्याने मोहम्मदचा जीव वाचला.

Pimpri Chinchwad
Maharashtra Shame : युवकाचा रात्रभर अपंग वृद्ध महिलेवर अत्याचार, नाशिक शहरात उमटले पडसाद

भटक्या कुत्र्याचा चावा इतका भयंकर होता की कुत्र्याने मोहम्मदच्या हाताचे लचके तोडले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याला तब्बल १३ टाके पडले आहेत. दरम्यान पिंपरीच्या (pimpri chinchwad) संत तुकाराम नगर येथील शिवनेरी सोसायटी येथे घडलेल्या या घटनेमुळं पुन्हा एकदा शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका भटक्या कुत्र्यांबाबत ठाेस उपयायाेजना करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com