Arrest, bhandara Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : आठ वर्षाच्या श्रद्धा सिडामच्या खूनाचे रहस्य उलगडलं; मुलास अटक

या तपासातील अधिका-यांचे लोहित मतानी (पोलिस अधिक्षक) यांनी अभिनंदन केले.

अभिजीत घोरमारे

Crime News : अखेर भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पापडा येथील आठ वर्षीय श्रद्धा सिडाम खूनप्रकरणाचा पोलिसांना सुगावा लागला आहे. अत्याचाराच्या प्रयत्नादरम्यान तोंड दाबल्याने श्रद्धाचा गुदमरुन मृत्यु झाल्यावर पुरावा नष्ट करण्यासाठी तनसाच्या ढिगाऱ्यात जाळल्याचे सिद्ध झाले आहे. (Tajya Batmya)

या प्रकरणी एका अल्पवयीन मुलास पाेलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी संशयाच्या आधारावर अटक केलेल्या एकाचा या गुन्हात कोणताही समावेश नसल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी : घटनेच्या दिवशी शिक्षकांची निवडणूक सभा असल्याने शाळेची सुटी लवकर झाल्यावर श्रद्धा लवकर घरी (home) आली होती. परंतु आई घरी नसल्याने आईच्या शोधात ती घराबाहेर गेली गेली. त्याच वेळीस घरात कुणी नाही हे पाहून संशयिताने मुलीला त्याच्या घरात नेत डाव साधून तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न केला. त्यावेऴी श्रद्धाचे तोंड दाबल्याने श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाला अशी माहिती पाेलिसांकडून मिळाली. (Maharashtra News)

त्यानंतर श्रद्धाला पोत्यात भरून घरामागील खड्ड्यात बूजविले होते. या प्रकाराचा थांगपत्ता लागू नये यासाठी श्रद्धाचा प्रेत खड्ड्यात बुजवून त्यावर तणसीचा काळी कचरा टाकून थिमेट टाकले. पोलिसांनी घटनेच्या दिवशी कसून तपास केला. परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही.

हे सगळं सुरू असताना तीस नोव्हेंबरच्या रात्री आरोपीने संधी साधून श्रद्धाचे प्रेत पोत्यासह खड्ड्यातून काढून हे घरामागील शेत शिवारात असलेल्या तणसीच्या ढिगारात नेऊन जाळले. या घटनेनंतर तपासातील पोलीसांनी संशयित आरोपिला अटक करण्यात आली होती, मात्र त्याच्या कडून कोणताही गुन्हा संबधिचा प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी अधिक तपासाचे चक्र फिरविले.

अखेर पोलिसांना (police) तपासात एक सुगावा लागला. त्यानंतर पाेलिसांनी एका साेळा वर्षीय मुलास अटक केली. या तपासातील अधिका-यांचे लोहित मतानी (पोलिस अधिक्षक) यांनी अभिनंदन केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT