nashik Crime News SAAM DIGITAL
महाराष्ट्र

Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; १० लाखांची खंडणी घेताना महिलेसह तिच्या मुलाला अटक

Nashik Crime News: नाशिकमध्ये १० लाखांची खंडणी घेताना एका आईसह मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

Vishal Gangurde

तबरेज शेख

Nashik Crime News:

नाशिकमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. नाशिकमध्ये १० लाखांची खंडणी घेताना एका आईसह मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. श्री स्वामी समर्थ आश्रमाच्या विश्वस्ताकडून ही खंडणी उकळण्यात येत होती. विशेष बाब म्हणजे विश्वस्ताने १ कोटी ५ लाख रुपये अटक करण्यात आलेल्या महिलेला यापूर्वी दिल्याचे उघड झाले आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी अटक करण्यात आलेली महिला कृषी अधिकारी असल्याचे समोर आले आहे. स्वामी समर्थ आश्रमात ही महिला २०१५ पासून जात होती. महिलेची आणि आश्रमाचे विश्वस्त यांची २०१५-१६ पासून जवळीक होती.

याच काळात अटक करण्यात आलेली महिला सारिका सोनवणे आणि मुलगा मोहित सोनवणे यांनी अश्लील व्हिडीओ असल्याचे सांगत विश्वस्त निंबा शिरसाठ यांच्याकडून पैसे उकळले आहेत. याच प्रकरणी १० लाखांची रक्कम स्वीकारत असताना या दोघांना जहान सर्कल परिसरात अटक करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

श्री स्वामी समर्थ आश्रमाचे विश्वस्त निंबा शिरसाठ यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाकडून त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास गंगापूर पोलीस करीत आहे.

दरम्यान, महिलेकडे असा कोणता व्हिडिओ आहे? ज्यामुळे आत्तापर्यंत महिलेला संबंधित तक्रारदराने आतापर्यंत १ कोटीहून अधिकची रक्कम दिली आहे. अध्यात्मिक संस्थेचे विश्वस्त यांच्याकडे इतकी रक्कम कुठून आली? ती महिलेला रोख स्वरूपात कशी काय दिली? याचाही तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

Kalyan Dombivli: उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला भाजप आमदाराच्या समर्थकाकडून मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

Konkan Beaches : ऑक्टोबरच्या कडक उन्हात थंडगार समुद्रकिनाऱ्याची सफर! पाहा कोकणच्या कुशीत लपलेले 'हे' ७ सुंदर किनारे

Maharashtra News Live Update: धुळे तालुक्यातील आदिवासी बांधवांचे तलावात उतरून आंदोलन

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

SCROLL FOR NEXT