प्रेमी युगुलांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, प्रेयसीसोबत करायचे अश्लील चाळे Saam Tv
महाराष्ट्र

प्रेमी युगुलांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, प्रेयसीसोबत करायचे अश्लील चाळे

शहराबाहेर रस्त्याच्या कडेला दुचाकीवर एकांतात वेळ घालवत असलेल्या, प्रेमी युगुलांना चाकूचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्या टोळीला कळमना पोलिसांनी अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर : शहराबाहेर रस्त्याच्या कडेला दुचाकीवर एकांतात वेळ घालवत असलेल्या, प्रेमी युगुलांना चाकूचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्या टोळीला कळमना पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत अनेक प्रेमीयुगुलांना लुटलेले आहे. बदनामीपोटी तक्रार करण्यात आली नव्हती. मात्र, एका प्रेमी युगुलाच्या तक्रारीवर या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

लक्ष्मण हटिलदास माणिकपुरी आणि राहुल सुरेश यादव राहणार हे कळमना येथील आहेत, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर राहुल उईके हा अद्याप फरार झाला आहे. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक हिरवेगार लव्हर स्पॉट आहेत. तसेच शहराच्या बाहेर जाणारे, रस्ते असल्याने प्रेमीयुगुलांचे थवे या परिसरामध्ये कायम घिरट्या घालत असतात.

रस्‍त्याच्या कडेला बाईक उभी करून, एकांत शोधत असतात. जोडप्यांना हेरून त्यांना चाकूचा धाक दाखवून, लुटणाऱ्या काही तरुणांच्या टोळ्या या भागात मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहेत. काही दिवसांपूर्वी जबलपूर रोडवर इंडियन ढाब्याजवळ एक युवक प्रेयसीसह एकांतात बसलेला होता. दरम्यान, लक्ष्मण हटिलदास माणिकपुरी आणि राहुल सुरेश यादव व राहुल उईके हे तिघे त्याठिकाणी आले होते.

हे देखील पहा-

त्यांनी प्रेमी युगुलाला मारहाण केली. युवकाच्या गळ्याला चाकू लावत आणि प्रेयसीला पर्समधील पैसे, मोबाईल आणि दागिने काढण्यास सांगितले होते. तिने नकार दिल्याने तिच्या प्रियकराच्या मांडीवर राहुलने चाकू मारला होता. भळाभळा रक्त निघाल्याने मुलीने सर्व पैसे आणि दागिने दिले, तर युवकाचाही मोबाईल आणि पैसे देखील हिसकावून घेण्यात आले होते. तरुण आणि त्याच्या प्रेयसीला मारहाण देखील करण्यात आली होती.

यानंतर त्यांनी पळ काढला होता. तो तरुण प्रेयसीसह कळमना ठाण्यात गेला आणि त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली आहे. ठाणेदार विश्‍वनाथ चव्हाण यांनी लगेच टोळीचा मागे लागण्याचे आदेश दिले होते. पीएसआय अनिल इंगोले यांनी क्षणातच पथकासह त्याठिकाणी रवाना झाले. विजयनगर बाजार चौकामधून राहुल यादव आणि लक्ष्मण माणिकपुरीला अटक करण्यात आली आहे.

यानंतर राहुल उईकेला याबद्दलची माहिती मिळताच, त्याने पळ काढलेला आहे. दोघांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. त्यांच्याकडून प्रेमी युगुलांकडून लुटलेली रक्कम आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. प्रेमी युगुल एकांतात बसल्याचे आढळ्यास त्यांना हेरून हे अशा टोळ्या लुटमार करण्याकरिता नेहमीच सक्रिय असतात.

टोळी मधील गुंड तरुणीच्या इभ्रतीवर प्रियकरासमोरच हात टाकत असतात. बदनामी टाळण्याकरिता शारीरिक संबंधाची मागणी देखील या टोळ्या करत असतात. लुटमार केल्यावर तरुणीची छेडखानी, अश्‍लील चाळेसुद्धा अशा टोळ्या करत आहेत. ही मुख्य टोळी कळमना पोलिसांनी अटक केल्याने पोलिसांचा त्याभागात वचक निर्माण झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा घसरले; १० तोळ्यामागे २९,४०० रुपयांची घसरण, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्री ४१ व्या वर्षी होणार आई, थाटात पार पडले डोहाळे जेवण | PHOTOS

Maharashtra Live News Update : धाराशिवात शेतकरी दुहेरी संकटात

भोंदू खरातचे काळे कारनामे संपेना! राजकीय नेत्यांना लावला लाखोंचा चुना; १ किलो मधाची बाटली ९ लाखांना विकायचा

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ऑनलाइन पेमेंटच्या नियमात केले बदल; तुमच्यावर काय होणार परिणाम? वाचा

SCROLL FOR NEXT