ahmednagr crime news  saam tv
महाराष्ट्र

अहमदनगर हादरले! चॉकलेटचे आमिष दाखवून ७ वर्षीय मुलीवर अत्याचार

घराच्या अंगणात खेळणाऱ्या ७ वर्षीय मुलीला पाणीपुरी, चॉकलेट, चिप्सचे आमिष दाखवून तिच्यावर तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ahmednagar Crime News : घराच्या अंगणात खेळणाऱ्या ७ वर्षीय मुलीला पाणीपुरी, चॉकलेट, चिप्सचे आमिष दाखवून तिच्यावर तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सदर घटना अहमदनगर (Ahmednagar) शहरात घडली. पीडित मुलीच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी युसूफ हमीद कुरेशी (वय ३४) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ वर्षीय मुलीची आई मोलमजुरीचे काम करते. या मुलीला तीन ते चार दिवसांपासून युसूफ कुरेशी हा पाणीपुरी, चॉकलेट, चिप्स देत होता. गणेश चतुर्थीनिमित्त शाळेला सुट्टी असल्याने त्याची मुलगी घरीच होती.

मुलीची आई कामावर गेल्यावर युसूफने मुलीला दुचाकीवरून घेऊन मंगलकार्यालयात घेऊन गेला. त्यानंतर युसूफनं मुलीवर अत्याचार केला. सदर कृत्याची माहिती मुलीच्या आईला समजताच त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने त्यांच्या इतर नातेवाईकांशी संपर्क केला. मुलीच्या आईने चाईल्ड लाईन संस्थेला देखील याबद्दल माहिती दिली.

संस्थेच्या स्वयंसेकांच्या मदतीने पीडित मुलीच्या आईने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसात धाव घेऊन युसूफ कुरेशी विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच युसूफ कुरेशी अहमदनगर शहरातून पसार होण्यापूर्वीच त्याच्या मुसक्या आवळल्या.

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने नराधमाला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलिस अंमलदार गणेश धोत्रे, शरद गायकवाड, योगेश भिंगारदिवे,तान्हाजी पवार, याकुब सय्यद सागर पालवे, दीपक रोहकले, सुजय हिवाळे, अमोल गाडे, संदीप थारोत, सोमनाथ राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jaggery Vs Sugar In Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी गूळ साखरेपेक्षा चांगला आहे का? रक्तातील साखर वाढू नये म्हणून गुळाचे सेवन किती करावे?

Maharashtra News Live Update: मुंबईत आगीच सत्र सुरूच, भांडूपमधील ड्रिम्स मॅालला आग

Political News: उपमुख्यमंत्र्यांचा घटस्फोट, अनेक वर्षांचा सुखी संसार मोडला; पोस्ट होतेय व्हायरल

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, एकाचा होरपळून मृत्यू

Gokul President Election: 'गोकुळ'चा अध्यक्ष कोण होणार? आज होणार स्पष्ट, शशिकांत पाटील की रणजीतसिंह पाटील कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT