मुंबई : अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) धडक कारवाई करत गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई आणि परिसरात गांजाची तस्करी होणार असल्याची खबर एनसीबीला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने धाड टाकून तब्बल २१० किलो गांजा (Ganja Seized) जप्त केला आहे. या गांजाची किंमत चार कोटी रुपये आहे. याप्रकरणी एनसीबीने एका आरोपीला अटक केली असून गांजाची तस्करी करणारे वाहनही ताब्यात घेतले आहे. (Narcotics Control Bureau latest News Update)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत गांजाच्या तस्करीचा एनसीबीने भांडाफोड केला आहे. गांजा तस्कर एका वाहनाद्वारे २१० किलो गांजा मुंबई आणि परिसरात नेत असताना एनसीबीने रस्त्यातच तस्करांच्या मुसक्या आवळल्या. चार कोटींचा गांजा मुंबईत विक्रीसाठी येणार असल्याची खबर एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.