जितेश कोळी
Pune Crime News : पुण्यातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पुणे जांभूळ रोडवर झालेल्या किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी चिपळूण येथील तरुणाचे अपहरण करून त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे . पुणे पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून केवळ दोन तासांमध्ये तीन संशयित आरोपींच्या मुस्क्या आवळल्या आहेत. सौरभ शैलेंद्र मयेकर (वय-२१) असे मृत युवकाचे नाव आहे. (Latest Marathi News)
नेमकं काय घडलं?
तिघांनी एका तरुणाचे अपहरण केले. तसेच त्याला साते गावच्या हद्दीतील ओढ्यात नेऊन डोक्यात दगड मारून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी घडली.
पोलिसांनी दोन तासांत खून करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली. याप्रकरणी व्हिजन सिटी जांभूळ येथील 18 वर्षीय संशयित आरोपीला व दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी (Police) अटक केली आहे.
यातील एक अल्पवयीन आरोपी जांभूळ तर दुसरा वडगाव माळीनगर येथील रहिवासी आहे. पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ मयेकर याची आरोपींसोबत जांभूळ रोडवर भांडणे झाली होती. यात सक्षम आनंदे याच्या पाठीवर कटर मारले होते.
या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मयेकर याची गाडी अडवून त्याचे अपहरण केले. ब्राह्मणवाडी साते गावच्या हद्दीत असलेल्या खापरे ओढ्याजवळ नेऊन त्याला मारहाण केली तसेच डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली.
हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी तातडीने दोन पथके तयार केली. मोबाइल लोकेशनच्या आधारे दोन तासांमध्येच तिन्ही आरोपींना पिंपरी- चिंचवड येथून अटक केली.
सहायक पोलिस निरीक्षक सुनील जावळे, सुनील मगर, अमोल कसबेकर, आशिष काळे, श्रीशैल कंटोळी, अमोल तावरे, सागर गाडेकर, गणेश होळकर, चेतन कुंभार, महिला पोलिस निर्मला उप्पू, केतकी सपकाळ, अर्चना मोरे, होमगार्ड सुरेश शिंदे या पथकाने ही मोठी कामगिरी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.