Crime News, Sangli SaamTv
महाराष्ट्र

Sangli News : पाेलिसांची माेठा कारवाई; सांगली, सोलापूर जिल्ह्यातून टाेळी हद्दपार

या टोळीतील सर्वांना तडीपार करण्यात यावे असा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता.

विजय पाटील

Sangli News : मारहाणीसह जीवे मारण्याच्या धमकीसह सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या सांगलीच्या (sangli) जत येथील विकास दुधाळ टोळीवर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. या टोळीतील सहा जणांना सांगली, सोलापूर जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी ही कारवाई केली आहे.

दुधाळ टोळीने चार वर्षांपासून जत येथे दहशत निर्माण केली आहे. बेकायदात जमाव जमूवुन घातक शस्त्रनिशी गंभीर दुखापत करणे, अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळून नेणे, शरीर संबंध ठेवणे, शिवीगाळ मारहाण करून ठार मारण्याची धमकी देणे या प्रकारचे सात गुन्हे (crime) या टोळीवर दाखल आहेत.

त्यामुळे या टोळीतील सर्वांना तडीपार करण्यात यावे असा प्रस्ताव जत पोलीस (police) निरीक्षक यांनी पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने तेली यांनी टोळीतील सहा जणांना दोन वर्षाकरिता दोन जिल्ह्यातून हद्दपारचे निर्देश दिले आहेत. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT