Latur News Saam Tv
महाराष्ट्र

२० लाखांची पोकलेन पळविली; देवणी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी ओमकार हावगीराव शेळके यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात संदीप नानासाहेब पांगीरे, राजकुमार रामचंद्र बिरादार या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लातूर - देवणी शिवारातून संगनमत करून विश्वासघाताने पोकलेन घेऊन गेल्या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी गुरप्पा शेळके यांच्या देवणी शेतशिवारात उभी केलेली शिवाजी शेळके यांच्या मालकीची हुंडाई कंपनीची २० लाख रुपये किंमतीची पोकलेन मशीन संदीप नानासाहेब पांगीरे व राजकुमार रामचंद्र बिरादार या दोघांनी चोरुन नेली.

हे देखील पाहा -

ही मशिन शंभर रुपयाच्या बाँड पेपरवर खरेदी खत करून घेतली होती. त्यानंतर एक महिण्यानंतर पोकलेन मशीनचा ताशी हिशोब न देता फिर्यादीची मालकीची पोकलेन मशीन आरोपीतांनी संगणमत करुन देवणी शेतशिवारातून २५० लिटर डिझेलसह घेवून गेले. त्याबाबतचे पैसे फिर्यादीस न देता अन्यायाने विश्वासघात केला. या प्रकरणी ओमकार हावगीराव शेळके यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात संदीप नानासाहेब पांगीरे, राजकुमार रामचंद्र बिरादार या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्भलिंगनिदान प्रकरणात चाकणकरांचं नाव अन् भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT