Viral Video Saam Tv
महाराष्ट्र

Viral Video: "बाळांनो कधीतरी आई होऊन वागा..." प्रत्येकानं ऐकावी आणि बघावी अशी 'आई 'वरची कविता, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

Viral Video: मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांची एक कविता सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नक्की कोणत्या विषयावर कविता आहे हे तुम्ही पाहा.

Tanvi Pol

मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे कायमच त्याच्या कविता आणि अनेक पोस्टनिमित्ताने प्रेक्षकांच्या चर्चेत असतो. शिवाय त्याच्या पोस्ट आणि कविता प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. संकर्षण कऱ्हाडे आपल्याला अनेकदा चित्रपट, विशेष नाटकमध्ये दिसत असतो. बऱ्याचदा मराठी कार्यक्रमांचे सुत्रसंचालन देखील करत असतो.

संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर जास्त सक्रिय असलेला दिसून येतो. तो कायम त्याला आलेले अनेक अनुभव शेअर करत असतो. अशातच संकर्षण कऱ्हाडेने एका कार्यक्रमामध्ये आईवरील एक अप्रतिम कविता सादर केली होती. ज्या कवितेने सर्वांना डोळ्यात पाणी आणायला भाग पाडले आहे. सध्या सोशल मीडियावर संकर्षण कऱ्हाडेची कविता(Poem) मोठ्या प्रमाणात व्हायरल(Viral) होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एका कार्यक्रमाचा सेट दिसत आहे. ज्या कार्यक्रमाच्या मंचावर संकर्षण कऱ्हाडे उभा आहे. त्यानंतर संकर्षण कऱ्हाडेच्या समोर अनेक प्रेक्षक बसलेले आहेत. त्यानंतर संकर्षण कऱ्हाडे आईवर लिहिलेली कविता म्हणण्यास सुरुवात करतो. जस जशी कविता तो सांगत जातो. समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यात आश्रु आलेले दिसून येत आहेत. अनेकांनी आईवर सादर केलेली कविता पटलेली आहे. मंचासमोर बसलेला प्रत्येकजण भावुक झालेला दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. एक्सवरील '@gabbarsiingh' या अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. ७ ऑक्टोबर रोजी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तब्बल अडतीस हजारहून अधिक एक्स यूजर्संनी व्हिडिओ पाहिला आहे तर लाईक्सही व्हिडिओला मिळाले आहेत.

व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''आत्ताच्या घडीला मराठी सिने सृष्टीत एकमेव कलाकार आहे जो आपल्या कवितेतून समोरच्या प्रत्येक श्रोत्याला रडवतो ही ताकद आहे त्याच्या शब्दात आणि लेखनीत. आईवरील त्याची ही अजून एक अप्रतिम कविता जी की डोळ्यात पाणी आणायला भाग पाडते'' असे कॅप्शन लिहिण्यात आलेले आहे. कविता ऐकून बऱ्याच यूजर्संनी प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजर्संनी लिहिले आहे की,''हे मला आई गेल्यावर कळल... आता कोठे डोक टेकव'' अशा भावनिक तर अनेकांनी संकर्षण कऱ्हाडेने केलेल्या कवितेचे कौतुक केले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Deool Band 2 Collection : IPL च्या धामधूमीतही 'देऊळ बंद 2' चा डंका; प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची तुफान क्रेझ, कमाईचा आकडा कितीवर पोहचला?

Myanmar Blast : शक्तीशाली बॉम्बस्फोटात ५५ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी; पाहा नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध रिलस्टार झाली हिरोईन, स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार 'श्रद्धा पवार', कोण आहे ही अभिनेत्री? पाहा तिचे फोटो

Accident News : महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; महिलेसह 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT