PM modi pune visit 2023:  Saamtv
महाराष्ट्र

Sharad Pawar Speech: 'देशातील पहिला सर्जिकल स्ट्राइक शिवरायांच्या काळात...' शरद पवार यांचे प्रतिपादन; मोदींबद्दल काय म्हणाले?

PM modi pune visit 2023: लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज प्रदान करण्यात येत आहे.

Prachee kulkarni

PM Narendra Modi to visit Pune: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज प्रदान करण्यात येत आहे. या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार- आणि मोदी एकाच मंचावर आले.

काय म्हणाले शरद पवार.?

"देशात अनेक राजे राजवाडे होऊन गेले, त्यांचं संस्थान त्यांच्या नावाने ओळखलं जायचं. शिवछत्रपतींचं काम वेगळ्या दिशेने झालं. शिवछत्रपतींनी रयतेच स्वराज्य उभं करण्याचं काम पुणे शहरात केलं. तो पुण्याच्या गौरवशाली इतिहासाचा भाग आहे.. असे म्हणत देशातील पहिला सर्जिकल स्ट्राइक शिवरायांच्या काळात झाला. शिवरायांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली" असं शरद पवार म्हणाले.

तसेच यावेळी पुढे बोलताना "लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांच्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र पत्रकारिता सुरू केली. पत्रकारांवर कोणाचा दबाव असता कामा नये.. ती मुक्त असावी अशी त्यांची भावना होती.. अशा शब्दात शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नरेंद्र मोदींचे अभिनंदन...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दलही शरद पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. लोकमान्य टिळक पुरस्कारांचे वेगळे महत्त्व होते. आत्तापर्यंत हा पुरस्कार इंदिरा गांधी, बाळासाहेब देवरस, मनमोहन सिंग अशा यांना मिळाला आहे. या यादीत आता नरेंद्र मोदींचा समावेश झाला. त्याबद्दल त्यांचे मी अंतकरणापासून अभिनंदन करतो.. असे शरद पवार यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Knee Joint Pain: गुडघेदुखीकडे दुर्लक्ष करू नका! वेळीच उपचार न घेतल्यास चालणं-फिरणंही होऊ शकतं कठीण

Government Job: नाशिक महापालिकेत २०४ पदांसाठी मेगाभरती, दरमहा मिळवा १.१० लाख पगार; कुठे अन् कसा करायचा अर्ज?

७२ व्या मजल्यावर बोलावलं अन् ५ कोटींची लाच मागितली; मंत्री संजय शिरसाटांवर राऊतांचा खळबळजनक आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना...

Microwave Cleaning : मायक्रोवेव्ह आतून चिकट अन् तेलकट झालाय? फक्त ५ रुपयांची 'ही' ट्रिक वापरून नव्यासारखा चमकेल

Maharashtra News Live Update: पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, इंडयूकेअर फार्मास्युटिकलचा परवाना रद्‌द

SCROLL FOR NEXT