PM Modi News Saam TV
महाराष्ट्र

PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हॉस्टेलमधील खळबळजनक घटना

Crime News: मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे आंदोलन करणार आहेत.

Ruchika Jadhav

Pune News:

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आठ नंबर हॉस्टेलमध्ये खळबळजनक घटना घडलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पद्धतीने लिहिले आहे. संबधित आक्षेपार्ह मजकूर कुणी लिहिला याचा शोध विद्यापीठाकडून घेतला जातोय.

विद्यापीठातच पंतप्रधान मोदी यांच्याविषयी मजकूर लिहिल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये खळबळ उडालीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले विद्यापीठातील भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी विद्यापीठ परिसरात आंदोलन करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डॉ. महेश रघुनाथ दवंगे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेमकं काय घडलं?

२ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता ही घटना घडली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ कॅम्पसमधील मुलांचे वसतीगृह क्र .८ येथील कपडे धुण्याच्या ठिकाणी अक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. भिंतीवर काळ्या रंगाच्या पेंटने इंग्रजी अक्षरामध्ये लिहिलं होतं. इतरांना त्रास होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी अश्लील लिखाण करण्याचे कृत्य करुन पुणे विद्यापिठाची बदनामी केली म्हणून अनोळखी इसमाविरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलाय.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत असे लिहिणे गैर आहे. शिवाय विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी ज्ञान मिळते अशा ठिकाणी ही घटना घडाली आहे. यामुळे शिक्षकांसह, विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये देखील खळबळ पसरलीये. विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने हे कृत्य कोणी केलं असं चित्रही उभं राहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

SCROLL FOR NEXT