PM Modi  Saam Tv
महाराष्ट्र

PM Modi Maharashtra Visit: PM मोदी महिन्याभरातच पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; लोकसभा प्रचाराचं रणशिंग फुंकणार?

PM Modi Yavatmal Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. याआधी त्यांचा सोलापूर आणि नाशिक दौरा झाला आहे. आता त्यांच्या यवतमाळ दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

PM Modi In Maharashtra

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ११ फेब्रुवारीला यवतमाळ दौरा आहे. पंतप्रधानाचा हा संभाव्य दौरा लक्षात घेऊन आज जिल्हा प्रशासनानं तातडीची बैठक बोलवली आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी बैठक आज होत आहे.

पंतप्रधान मोदींची सभा

यवतमाळमध्ये पंतप्रधान मोदी येणार (PM Modi Maharashtra Visit) आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि महसूलसह २५ विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यवतमाळमधील किन्ही इथे पंतप्रधान मोदींची सभा होणार असल्याची माहिती मिळत आहे. मोदींच्या या सभेकडे सगळ्या नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

प्रचाराचं रंगशिंग फुंकणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ११ फेब्रुवारीला किन्ही इथे महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार (PM Modi Yavatmal Visit) आहे. यवतमाळ-वाशिम आणि चंद्रपूर-आर्णी लोकसभेच्या दृष्टिकोनातून ते यवतमाळमधून प्रचाराचं रंगशिंग फुंकणार आहे.

महिला बचत गटांच्या मेळाव्याला संबोधित करणार

या दरम्यान वर्धा ते नांदेड रेल्वे मार्गाचे वर्धा ते कळंबपर्यंत काम झालंय. या कामाचं उद्घाटन करण्याची शक्यता देखील वर्तविली जातेय. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत. याअगोदर त्यांनी २०१९ मध्ये पांढरकवडा येथे महिला बचत गटांच्या विराट सभेला मार्गदर्शन केलं होतं. आता त्याच पार्श्वभूमीवर यवतमाळ येथील किन्हीजवळ महिला बचत गटांच्या मेळाव्याला मोदी संबोधित करणार आहेत.

सोलापूर दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा १९ जानेवारीला सोलापूर दौरा होता. त्यांनी देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असणाऱ्या रे नगरचं लोकार्पण केलं. त्यासाठी प्रशासन सज्ज झालं होतं. रे नगर परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. एकूण सहा हेलिपॅडची व्यवस्था त्या ठिकाणी केली गेली होती.

नाशिक दौरा

नाशिक पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारीला नाशिक दौरा पार पडला. नाशिकच्या निलगिरी बाग येथे हेलिपॅडवर त्यांचं सकाळी ११ वाजता आगमन झालं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिरची हॉटेल ते स्वामीनारायण चौकपर्यंत रोड शो (PM Modi Maharashtra Visit) केला. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गंगा गोदावरीची आरती करण्यात आली होती. यावेळी त्यांनी काळाराम मंदिराची सफाई देखील केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

6,6,6,6,6,6,6,6...षटकारांचं वादळ, 11 चेंडूत ८ षटकार; युवा फलंदाजाचा विश्वविक्रम

Maharashtra Politics: जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपये बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा|VIDEO

SCROLL FOR NEXT