Pm Modi in solapur  Saam TV
महाराष्ट्र

PM Modi in Solapur : उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे... PM मोंदीच्या उपस्थितीत मंचावरील एका भाषणाने सर्वांच्या भुवया उंचावल्या, पाहा VIDEO

PM Modi in Solapur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार देखील उपस्थित आहेत.

प्रविण वाकचौरे

PM Modi In Solapur :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूरमध्ये उभारण्यात आलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आहे. या कार्यक्रमात राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार देखील उपस्थित आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार नरसय्या आडम यांच्या भाषणाने झाली. मात्र आडम यांच्या भाषणाच्या सुरुवातीनेच अनेकांच्या भुवया उंचावल्या. आडम यांनी भाषणात उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. मात्र आपली चूक झालीय हे लक्षात येताच आडम यांनी आपली चूक सुधारली. आडम यांनी देवेंद्र फडणवीस यांची मंचावरुनच माफी देखील मागितली. (Latest Marathi News)

नरसय्या आडम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानले. पंतप्रधान मोदींनी २०१९ रोजीमध्ये या गृहनिर्माण प्रकल्पाची पायभरणी केली होती. आज आनंद होतोय की पंतप्रधान मोदी १५००० घरांची चावी देण्यासाठी दिल्लीहून इथे आले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं सहकार्य लाभलं. राज्य सरकारने म्हाडाकडून २७० कोटी दिले. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ३० हजार घरं तयार होतील. त्यानंतर हे देशातील पहिलं श्रमिक शहर असेल, आडम यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anagha Atul: भरपावसात साडी नेसून अनघा अतुलचं बोल्ड फोटोशूट, Photos

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार! चेंबूरमध्ये पालिका रुग्णालयाबाहेर ४ फुटांपर्यंत पाणी, रुग्णांना खांद्यावरून नेण्याची वेळ; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT