PM Kisan Yojana Saam Tv
महाराष्ट्र

PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! ३२२४ शेतकऱ्यांना मिळणार नाहीत ₹२०००; यवतमाळनंतर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वगळले

PM Kisan Yojana 3224 Farmers Will not Get Installment: पीएम किसान योजनेतून अनेक शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहे. योजनेतून अमरावती जिल्ह्यातील ३२२४ शेतकऱ्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पीएम किसान योजनेतून ३,२२४ लाभार्थी वगळले

अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावे कमी झाली

PM Kisan Yojana Updates: केंद्राच्या पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. प्रत्येक हप्त्यात २००० रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेत मागच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान, आता या योजनेतून हजारो शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहेत.

पीएम किसान सन्मान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झाला. मात्र २०वा हप्ता दिल्यानंतर केंद्र सरकारने योजनेत अनेक निकष लावले. तसेच आधार व ई केवायसी रखडले असल्याने अनेक शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात आले आहेत.

अमरावतीतील ३,२२४ लाभार्थी वगळले

अमरावती जिल्ह्यातील 3 हजार 224 लाभार्थी या योजनेतून वगळण्यात आले आहे. बँकेच्या व्यवहारासाठी ई केवायसी आवश्यक असते. केवायसी न केल्याने पुढचा हप्ता बंद होतो नंतर केवायसी केली तरी तो हप्ता मिळत नाही.

पीएम किसान सन्मानच्या 21 वा हफ्ता 19 नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार 974 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. मात्र असं असतानाही प्रत्येक हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करताना या योजनेतून शेतकरी कमी होत आहे, यावेळी अमरावती जिल्ह्यातील 324 शेतकरी कमी झाले आहेत. या योजनेत एक कुटुंबातील फक्त १ शेतकरी लाभ घेऊ शकतो. त्यामुळेदेखील अनेक लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT