Pimpri Chinchwad Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad : खिडकीचे पडदे काढताना विद्यार्थी खाली कोसळला; दोन्ही हात निकामी, पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील घटना

Pimpri Chinchwad News : शाळेत सफाई कर्मचारी असताना सुद्धा शाळेच्या मुख्याध्यापक आणि सफाई कर्मचाऱ्यांनी प्रथमेश कदम या विद्यार्थ्यांकडून काम करून घेत असल्याचे घटनेवरून समोर आले

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : शाळेत साफसफाईचे काम सुरु असताना सफाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी शाळेतील विद्यार्थ्याला खिडकीचे पडदे काढण्यासाठी वर चढविले. मात्र पडदे काढत असताना एका अनाथ आश्रमातील विद्यार्थी तोल गेल्याने खाली पडला. यामुळे त्याचे दोन्ही हात मोडले असून गंभीर जखमी झाला आहे. सदरची घटना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत घडली आहे. 

थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत प्रथमेश शशिकांत कदम (वय १२) या विद्यार्थ्यांचे दोन्ही हात मोडून तो गंभीररित्या जखमी झाला आहे. विशेष म्हणजे शाळेत सफाई कर्मचारी असताना सुद्धा शाळेच्या मुख्याध्यापक आणि सफाई कर्मचाऱ्यांनी प्रथमेश कदम या विद्यार्थ्यांकडून काम करून घेत असल्याचे घटनेवरून समोर आले आहे. 

त्यानुसार प्रथमेश यास सफाई कर्मचाऱ्याने खिडकीतील पडदा शिडीवर चढून काढण्याचे काम सांगितले. सीडीवर चढला असताना प्रथमेशचा तोल गेल्याने ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत प्रथमेश कदम हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्या दोन्ही हातांचे हाड मोडले आहे. घटनेनंतर त्याला लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता हातांवर शस्त्रक्रिया करावी लागणार असा सल्ला वैद्यकीय चिकित्सकांनी दिला आहे. 

दोन जणांवर गुन्हा दाखल 

या प्रकरणात आता स्पंदन बाल आश्रमाचे संचालक मनोज भीमराव मस्के यांच्या तक्रारीवरून काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेची शिक्षिका मुक्ता धोगडे आणि सफाई कर्मचारी गणेश तांबे या दोघांविरोधात बी एन एस कलम १२५ (ब) आणि बाल न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: घसरणीनंतर सोनं महागलं, सोन्याच्या दरात २२०० रुपयांनी वाढ, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Maharashtra Live News Update: मुंबईच्या डोमेस्टिक एअरपोर्टला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Mahila Samriddhi Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळणार ₹२५००; सरकारने केली मोठी घोषणा

Famous Actor Death: प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड; गंभीर आजाराशी झुंज ठरली अपयशी

Ashok Kharat: 'ईशानेश्वर महाराज आले' सांगत साप दाखवला, उत्तर पूजेच्या नावाखाली ५ कोटींचा गंडा; भोंदूबाबा खरातचा नवा कारनामा

SCROLL FOR NEXT