Pimpri Chinchwad Crime Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Crime : पिंपरी चिंचवडमधील घरफोडीतील संशयित महिला ताब्यात; ९ तोळे दागिने हस्तगत

Pimpri Chinchwad News : मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली हिवाळा असल्याने अनेकजण घराचे दरवाजे बंद करून लवकर झोपून गेलेले असतात. यामुळे परिसरात शांतात असते. याचा फायदा चोरटे घेत असतात

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात काही दिवसांपूर्वी घरफोडी झाली होती. याचा तपास सुरु असताना काळेवाडी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. तर तिच्या जवळ असलेल्या जवळपास ६ लाख २९ हजार रुपये किमतीचे ९ तोळे सोन्याचे दागिने घरफोडीतील गुन्ह्यात जप्त केले आहेत.

बंद घराची टेहळणी करत त्याठिकाणी संधी साधत चोरी केली जात असते. अशाच प्रकारे काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील ओम साई संतोष पार्टनर बिल्डिंगमधील संतोष आचारी याच्या घरातील सदस्य हे त्यांच्या मुलाला घेऊन रुग्णालयात गेले होते. याच वेळी त्यांच्या घरात चोरी झाली होती. यात सोन्या- चांदीचे दागिने चोरण्यात आले होते. हि घटना १६ डिसेंबरच्या दिवशी घडली होती. या प्रकरणी आचारी परिवाराने पोलिसात तक्रार दाखल केली होती. 

९ तोळे दागिने जप्त 

दरम्यान या चोरीच्या घटनेचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. या तपासात पोलिसांना सोनाली निलेश ओहाळ या महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून ९ तोळे वजनाचे दागिने हस्तगत केले आहे. दरम्यान या महिलेने त्यांच्या घरात घुसून आचारी यांच्या घरातील सोन्या चादीच्या दागिन्यांची चोरी केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 

चोरीच्या घटना वाढल्या 

मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हिवाळा असल्याने अनेकजण घराचे दरवाजे बंद करून लवकर झोपून गेलेले असतात. यामुळे परिसरात शांतात असते. याचा फायदा चोरटे घेत असतात. तसेच बंद असलेल्या घरांची पाहणी करून रात्रीच्या वेळेस दरवाजा तोडून चोरटे हात साफ करत असतात. अशाच प्रकारे पिंपरी चिंचवडमध्ये देखील चोरी झाल्याचे समोर आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT