Onion Price Drop : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण; शेतकऱ्याचा उत्पादन खर्च निघणेही कठीण

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल कांद्यांची काढणी करण्यात येत आहे. यामुळे मार्केटमध्ये नवीन लाल कांद्याची आवक सर्वच बाजार समितीत वाढत आहे
Onion Price Drop
Onion Price DropSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : होलसेल व किरकोळ बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याला चांगला दर मिळत होता. मात्र मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होण्यास सुरवात झाली आहे. लाल कांदा काढणी होत असून शेतकरी लागलीच विक्रीसाठी आणत आहे. यामुळे कांद्याची आवक वाढली असल्याने दरात घसरण होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल कांद्यांची काढणी करण्यात येत आहे. यामुळे मार्केटमध्ये नवीन लाल कांद्याची आवक सध्या जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत रोजच वाढत आहे. विधानसभा निवडणूकीपुर्वी ४ ते ६ हजार रुपये विकला गेलेला कांदा आवक वाढल्याने सध्या कांद्याच्या दरात घसरण होत आहे. मागिल महिन्यात ३ हजारापर्यंत असलेले दराने विकला गेलेला कांदा आजच्या परिस्थितीला १६०० ते १८०० रुपयांवर आलेला आहे.

Onion Price Drop
Majalgaon News : मोंढ्यात २ लाख ३८ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी; गतवर्षीच्या तुलनेत कमी खरेदी

खर्च निघणेही झाले कठीण 

मुळात कांदा लागवडीला मोठा खर्च येत असतो. ज्यात शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. मात्र सध्या मिळत असलेल्या दरामुळे कांद्यासाठी केलेला खर्च तर वसूल होतच नाही. शिवाय कुटूंबातील लग्न किंवा ईतर गोष्टीसाठी लागणारा खर्च कसा वसूल होईल; अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. जेव्हा भाव वाढतात तेव्हा शेतकऱ्यांकडे कांदा फारसा शिल्लक नसतो. मात्र सर्वच ठिकाणाहून आवक वाढत आहे. सरकारने महाराष्ट्रातील लावलेली २० टक्क्यांचे निर्यातमूल्य काढल्यास कांदा निर्यत होऊन भाव वाढू शकतील. अशी आशा शेतक-यांनी व्यक्त केली आहे. 

Onion Price Drop
Jalna CIDCO Project : जालन्यातील खरपुडी येथील सिडको प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध; कमी मोबदला दिल्याचा आरोप

फूलगोबी उत्पादक शेतकरीही अडचणीत
नांदेड
: बाजारात सध्या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फूलगोबी सारख्या भाज्यांना तर आता बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे फुलगोबी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील रामराव नांदेडकर या शेतकऱ्याने एक एकर शेतीमध्ये फुलगोबीची लागवड केली होती.

फूलगोबी सध्या काढणीला आलेली असून बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने फूलगोबी जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आल्याचे ते सांगत आहेत. एक एकर फूलगोबी लागवडीसाठी त्यांना 80 ते 90 हजार रुपये खर्च आला. या एक एकर मधून त्यांना दोन लाख रुपये उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती. परंतु लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने फुलगोबी उत्पादक शेतकरी रामराव नांदेडकर हे हतबल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com