Pimpri Chinchwad Corporation Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Corporation : विनापरवानगी रस्ता खोदून दोन कोटींचे नुकसान; पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दोघांवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad news : देविका इलेक्ट्रिकल आणि पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक गेरा बिल्डर विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला

गोपाळ मोटघरे


पिंपरी चिंचवड : विनापरवाना रस्ता खोदाईचे काम करण्यात आले. या रस्ता खोदाईमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे दोन कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी महापलिकडून बांधकाम व्यवसायीक आणि इलेक्ट्रिशियन विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून देविका इलेक्ट्रिकल आणि पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक गेरा बिल्डर विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस (Police) स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन- तिन आठवड्यापूर्वी गेरा बिल्डरकडून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वृक्ष तोड केल्याप्रकरणी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा गेरा बिल्डर यांच्यासाठी बेकायदेशीर रस्ते खोदाई करून पिंपरी चिंचवड महापालिकेचे जवळपास दोन कोटी रुपयांचं नुकसान करण्यात आलं आहे. 

काम सुरु असताना मनपाचे दुर्लक्ष 

पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात अनधिकृत वृक्षतोड करण्यात येत होती आणि जेव्हा प्रत्यक्षात अनधिकृत रस्ते खोदाई करण्यात येत होती. त्यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष का केलं? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी; अशी मागणी तक्रारदार रविराज काळे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा १५ दिवसांसाठी बंद, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

Pune News: पुण्यामध्ये झालंय बनावट मतदान! ८ मतदारसंघात घडला धक्कादायक प्रकार

Navjot Singh Sidhu: नवज्योतसिंग सिद्धूचा कर्करोगाचा दावा किती खरा? टाटा मेमोरियल हॉस्पिटलने सांगितले सत्य

Pune Election Results: पुणे जिल्ह्यातून ४ नव्या आमदारांचे चेहरे; 14 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

Shivsena UBT News : मातोश्रीवर आज नवनिर्वाचित आमदारांची बैठक, काय होणार चर्चा? पाहा Video

SCROLL FOR NEXT