Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad : गणेशोत्सवात लेझर बीम लाईटचा वापर, डीजेचा दणदणाट; पिंपरी चिंचवडमधील ४० मंडळांवर कारवाई

Pimpri Chinchwad News : मंडळांकडून लेझर लाईट तसेच डीजे लावण्यात येत असतात. यामुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत असतो. हि बाब लक्षात घेत याच्या वापरावर पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली होती

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात लेझर बीम लाईटचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली होती. असे असताना देखील लेझर बीम लाईटचा वापर करून पोलिसांनी काढलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. शहरातील अशा एकूण ४० मंडळांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

गणेशोत्सवामध्ये काही मंडळांकडून लेझर लाईट तसेच डीजे लावण्यात येत असतात. यामुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत असतो. हि बाब लक्षात घेत याच्या वापरावर पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली होती. तरी देखील काही मंडळांनी याचे उल्लंघन केले असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यात वाकड पोलिस स्टेशन हद्दीत १७, पिंपरी पोलिस स्टेशन हद्दीत ८, निगडी व सांगवी पोलिस स्टेशन हद्दीत प्रत्येकी ५, दापोडी पोलिस स्टेशन हद्दीत ३, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीत २ कारवाई करण्यात आल्या आहेत.

ध्वनी प्रदूषणाबाबत कारवाई बाकी

याशिवाय डीजे किंवा मोठ्या आवाजांत स्पीकर लावण्यावर बंदी होती. या अनुषंगाने ध्वनी प्रदूषण संबंधात या कालावधीत मोठ्या प्रमाणात नॉइस लेवल मीटर या उपकरणाद्वारे आयुक्तालय हद्दीत ठिकठिकाणी ध्वनीच्या पातळीची मोजणी करण्यात आली आहे. त्याबाबत संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्त यांचेकडून प्राथमिक चौकशी करण्यात येत असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात ४५४ मंडळांना नोटीस 
कोल्हापूर : गणेशोत्सवात साऊंड सिस्टीमचा दणदणाट करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ४५४ मंडळांना पोलिसांनी नोटीस पाठविल्या आहेत. या मंडळांनी ६० दिवसांत त्याचे उत्तर द्यायचे आहे. त्यानंतर पोलिस उपअधीक्षकांकडून पुराव्यासह खटले दाखल होणार आहेत. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होऊ नये, ट्रॅक्टरच्या बोनेटवर उभा राहून नाचू नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्याहोत्या. तरीही पोलिसांच्या आवाहनाला धाब्यावर बसवून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धडकी भरविणारा आवाज सिस्टीमवर सोडला. पोलिसांनी या संदर्भातील नोंदी घेत त्यांना नोटीस दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festival Makeup Look: सणासुदीला खास लूक हवा असेल तर यावेळी 'हा' मेकअप लूक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना रोडवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

SCROLL FOR NEXT