Pimpri Chinchwad Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात बनावट विदेशी मद्याचा कारखाना उद्ध्वस्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Pimpri Chinchwad News : सापळा रचून एका ऑटो रिक्षावर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये ऑटो रिक्षामध्ये स्वस्त दर्जाच्या रिकाम्या दारू बाटलीत महागडी स्कॉच दारू रिसीव करून भरण्यात येत असल्याचे आढळून आले

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत बनावट विदेशी मद्य तयार करण्यात येणार कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे. नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हि मोठी कारवाई मानली जात आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीवरून पिंपरी येथे एका हॉटेलसमोर पथकाने सापळा रचून एका ऑटो रिक्षावर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये ऑटो रिक्षामध्ये स्वस्त दर्जाच्या रिकाम्या दारू बाटलीत महागडी स्कॉच दारू रिसीव करून भरण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऑटो रिक्षा चालक आणि ऑटो रिक्षामधील दारू वाहतूक करणारा मालक धनजी जेटा पटेल याना ताब्यात घेत चौकशी केली. 

दोघांची चौकशी केली असता त्याने मारूनजी येथील स्प्रिंग बुड्स सोसायटी मधील फ्लॅट नंबर 201 या ठिकाणी ही बनावट दारू तयार केल्याचे सांगितले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्प्रिंग वूड सोसायटीच्या फ्लॅटमध्ये धाड टाकली. त्या ठिकाणी एक लिटर क्षमतेच्या १८ सीलबंद दारू बाटल्या, तसेच विविध ब्रँडच्या उच्च प्रतीच्या स्कॉच दारूच्या ११० रिकामा वाटल्या, बुचे, लेबल, इतर साहित्य आढळून आले. 

५ लाख ९६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाने रिकाम्या बाटल्यांसह तीन चाकी ऑटो रिक्षा, एक दुचाकी वाहन, एक मोबाईल फोन असा ऐकून पाच लाख ९६ हजार ५१० रुपये किमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. तसेच संशयित आरोपी धनजी जेटा पटेल आणि ऑटो रिक्षा चालक शिवाजी धाकतोडे या दोघांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नेत्यांच्या बेडरूममध्ये गेल्याशिवाय ९० टक्के महिला राजकारण करू शकत नाहीत; खासदार पप्पू यादव यांचे वादग्रस्त विधान

Crime News: नंबर ब्लॉक केला, दुसऱ्याच मुलाशी केली मैत्री; रागाच्या भरात बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला संपवलं

Long Hair Growth Tips: लांब आणि सरळ केसांसाठी 5 सोपे घरगुती उपाय

Wednesday Horoscope : वैवाहिक आयुष्यात वादळ येण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना धाडसी निर्णय घ्यावे लागतील

SCROLL FOR NEXT