Warna River : वारणा नदीत मगरीसह हजारो माशांचा मृत्यू; मळीमिश्रित पाण्यामुळे ५ गावांचा पाणीपुरवठा केला बंद

Sangli News : मिरज तालुक्यातील दुधगाव येथून वाहत असलेल्या वारणा नदीत गेल्या दोन दिवसांपासून मृत मासे दिसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मळी मिश्रीत पाण्यामुळे पाणी दूषित झाल्याने प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन मासे मृत्युमुखी पडत आहेत.
Warna River
Warna RiverSaam tv
Published On

सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील दुधगाव येथे वारणा नदीमध्ये मळीयुक्त पाणी येत आहे. यामुळे पाणी दूषित होऊन ते आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. परिणामी नदीत मगरीसह हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसून येत आहेत. तर नदीची पाणीपातळी वाढताच मळी मिश्रित पाणी त्यामध्ये सोडल्याने पाणी दूषित झाले आहे. नदीकाठावर सर्वत्र फेस जमा झाला आहे.

सांगलीच्या मिरज तालुक्यातील दुधगाव येथून वाहत असलेल्या वारणा नदीत गेल्या दोन दिवसांपासून मृत मासे दिसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मळी मिश्रीत पाण्यामुळे पाणी दूषित झाल्याने प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन मासे मृत्युमुखी पडत आहेत. शिवाय दूषित पाण्यामुळे शिगाव, खोची, दूधगाव, कवठेपिरान यासह अनेक गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरवर्षी वारणा नदीला पहिले पाणी आले की, मळीमिश्रित पाणी नदीत सोडले जाते. 

Warna River
Markadwadi Voting: मारकडवाडीतील बॅलेट पेपरवरील मतदान थांबवलं, उत्तम जानकरांचे प्रशासनावर आरोप

मगरीचाही मृत्यू 

वारणा नदीचे पाणी दूषित झाल्याने मगरीच्या पिलाचा देखील मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी मगरीचा मृतदेह नदीतून वाहत आल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. याबाबत त्यांनी वन विभागाला माहिती दिली. मात्र, सायंकाळपर्यंत मृत मगर नदीपात्रातच तरंगत होती. पाण्याला काळा रंग आला असून दुर्गंधीही पसरलेली आहे. दुधगाव येथे वारणा नदीचे पाणी दूषित झाल्याने मगरीच्या पिल्लासह हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत.

Warna River
Amravati Politics : बळवंत वानखेडेंनी स्वीकारले नवनीत राणांचे आव्हान; ईव्हीएमवरून अमरावतीत रंगला वाद

गावांचा पाणीपुरवठा केला बंद 

वारणेला दूषित पाणी आले असतानाही ग्रामपंचायत काहीही कार्यवाही करत नाही. गावातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मळी मिश्रीत पाणी नदीत सोडणाऱ्यांवर मोर्चा काढावा. मळी मिश्रित पाणी पुन्हा नदीपात्रात सोडले जाऊच नये; यासाठी आक्रमक होणे गरजेचे आहे. तर नदीचे पाणी दूषित झाल्याने गावाचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी शिल्लक पाणी पुरवून वापरावे. तसेच ते उकळून व शुद्ध करून प्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com