Pimpri Chinchwad Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad : मद्यधुंद अवस्थेत गाड्यांची तोडफोड; नागरिकांवरही भिरकावले दगड, पोलिसांनी घेतले ताब्यात

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील लक्ष्मी नगर या ठिकाणी एका मद्यधुंद गाव गुंडाने चार चाकी वाहनांची तोडफोड केली आहे.

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गावगुंडाने चार चाकी वाहनांची तोडफोड केली आहे. एकामागून एक गाड्यांवर दगड फेकून मारत गाड्यांचे काच फोडले आहेत. इतकेच नाही तर वागरिकांवर देखील दगड भिरकावून मारले असता यात एक वयोवृद्ध महिला थोडक्यात बचावली आहे. 

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील पिंपळे गुरव येथील लक्ष्मी नगर या ठिकाणी एका मद्यधुंद गाव गुंडाने चार चाकी वाहनांची तोडफोड केली आहे. मद्यधुंद गावगुंडाने दगड भिरकावून जवळपास पाच- सहा चार चाकी वाहनांची तोडफोड केली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावगुंडाने वाहनांची तोडफोड केली आहे. या प्रकरणात सांगवी पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्या मद्यधुंद गुंडाला ताब्यात घेतला आहे. वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी सांगवी पोलीस (Police) स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

महिला थोडक्यात बचावली 

परिसरात सदरचा प्रकार सुरु असताना आजूबाजूला नागरिकांची गर्दी देखील जमली होती. यावेळी सदर इसमाने नागरिकांच्या दिशेने देखील दगड भिरकावले. यात एक वयोवृद्ध महिला थोडक्यात बचावली आहे. दरम्यान गाड्यांचे काच फोडल्याने यात मोठे नुकसान झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT