Wakad Police Saam tv
महाराष्ट्र

Wakad Police : टपरी चालकाकडून ५ किलो गांजा जप्त; थर्टी फर्स्टच्या रात्री वाकड पोलिसांची कारवाई

Pimpri chinchwad News : शहरातील उच्चभ्रू सोसायटी जवळील एका पान टपरीत गांजा या अंमली पदार्थाची विक्री करतो अशी गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे वाकड पोलिसांनी टपरीवर छापा टाकत तपासणी

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली होती. या शिवाय अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत ठिकठिकाणी तपासणी करण्यात आली. शहरात राबविण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी एका पान टपरी चालकाकडून ५ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. 

थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन अलर्ट होते. अनुचित प्रकार रोखण्यासाठी नाकाबंदी करत पोलीस पथक तैनात करण्यात आले होते. याच दरम्यान शहरातील उच्चभ्रू सोसायटी जवळील एका पान टपरीत गांजा या अंमली पदार्थाची विक्री करतो; अशी गोपनीय माहिती वाकड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वाकड पोलिसांनी टपरीवर छापा टाकत तपासणी केली असता गांजा आढळून आला. 

अडीच लाखाचा गांजा जप्त 

सदरच्या टपरीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५ किलो १०० ग्रॅम इतका गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजा या अंमली पदार्थाची एकुण किंमत जवळपास २ लाख ५५ हजार रुपये इतकी आहे. पुनीतकुमार विवेक शेट्टी या पान टपरी चालकाकडून वाकड पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे. पुनीतकुमार विवेक शेट्टी हा वाकड परिसरातील फ्रीस्टिन प्रोफाइल या उच्चभ्रू वस्तीत आपला व्यवसाय करत होता.   

टपरी चालकाला घेतले ताब्यात 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत पुनीत कुमार विवेक शेट्टीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्या विरोधात वाकड पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यानुसार नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुनीत कुमार विवेक शेट्टी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात यापूर्वी सुद्धा वाकड, हिजवडी आणि दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा हप्ता; ₹२००० मिळवण्यासाठी हे काम लगेच करा

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

Pune Tourism : २००० वर्षांहून अधिकचा ऐतिहासिक वारसा जपतेय 'हे' ठिकाण, लोखंडासारखा मजबूत आहे किल्ला

Nashik TCS Case: आसिफ ऑफिसमध्ये माझ्या मांडीवरून हात फिरवायचा अन्...; नाशिक TCS प्रकरणात महिला कर्मचाऱ्याचा धक्कादायक खुलासा

Riteish Deshmukh - Raja Shivaji : 'राजा शिवाजी' मध्ये सलमान खानची एन्ट्री, कोणती भूमिका साकारणार? रितेश देशमुखने सर्वकाही सांगितले

SCROLL FOR NEXT