Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: पंधरा वर्षांपुर्वीच्‍या खुनाचा उलगडा; विवाहबाह्य संबंधातून प्रेयसीचा केला होता खून

पंधरा वर्षांपुर्वीच्‍या खुनाचा उलगडा; विवाहबाह्य संबंधातून प्रेयसीचा केला होता खून

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत जवळपास पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा (Crime News) गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आला आहे. या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Police) गुन्हे शाखा एक पथकाने अप्पा गोगाजी मोहिते या पन्नास वर्षाच्या आरोपीस अटक केली आहे. (Breaking Marathi News)

अप्पा गोगाजी मोहिते यांने पंधरा वर्षांपूर्वी (Bhosari) भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत विवाहबाह्य संबंधातून आपल्या प्रेयसीचा खून केला होता. या प्रकरणात भोसरी पोलीस स्टेशनमध्ये २००८ ला अप्पा गोगाजी मोहिते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खून केल्यानंतर अप्पा मोहिते हा पोलिसांच्या (Pimpri Chinchwad) हातावर तुरी देऊन फरार झाला होता. फरार झाल्यापासून अप्पा मोहितेची काहीच माहिती पोलिसांना मिळत नव्हती. मात्र तो प्रकाश चव्हाण गँगचा सदस्य असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.

नाव बदलून राहत होता आरोपी

त्यानंतर पोलिसांनी प्रकाश चव्हाण गँगकडे सुरू केलेल्या तपासात तो चाकण एमआयडीसी परिसरामध्ये नाव बदलून राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अतिशय शिताफीने अप्पा मोहिते याला त्याच्या प्रेयसीच्या खुणाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. आप्पाची प्रेयसी त्याला त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन स्वतःशी लग्न कर नाहीतर तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. त्याने अपहरण करून तिचा खून केल्याची कबुली अप्पा गोगाजी मोहिते यांनी पोलीस तपासात दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT