Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Crime : देशी कट्ट्याचा धाक दाखवून लुटमार; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pimpri Chinchwad News : हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये ४ आणि चातुष्रुंगी २ असे एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. लुटमारीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या दोघांकडून मुद्देमाल हस्तगत केला

Rajesh Sonwane

पिंपरी चिंचवड : देशी कट्ट्याचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी सक्रिय झाली होती. अनेकांची लूटमार केल्याच्या घटना घडल्यानंतर पोलीस यांच्या मागावर होते. त्यांचा शोध घेत हिंजवडी पोलिसांनी टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या टोळीकडून हिंजवडी पोलिसांनी एक देशी कट्टा, चार जिवंत काडतूस, आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतलेले अजय शंकर राठोड आणि जिशान जहीर खान अशी लोकांना लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगारांची नावे आहेत. गावठी कट्ट्याचा धाक दाखवून हे दोघे भर रस्त्यावर लूटमार करायचे. दरम्यान सुसउडान पुलाखाली अजय शंकर राठोड आणि जिशान जहीर खान हे लोकांना लुटण्यासाठी दबा धरून बसले आहेत; अशी गोपनीय माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती. त्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचून दोन्हीं आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

दोघांवर यापूर्वीही गुन्हे दाखल 

पोलिसांनी ताब्यात घेतलेले अजय राठोड आणि जिशान खान हे रेकोर्ड वरील गुन्हेगार असुन त्यांच्यावर हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये ४ आणि चातुष्रुंगी २ असे एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. लुटमारीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या दोघांकडून मुद्देमाल हस्तगत केला असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price Hike: साखरेचे दर 18 दिवसात पुन्हा वाढले; ग्राहकांना मोठा झटका, दरात वाढ का होतेय?

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

SCROLL FOR NEXT