Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: जेवनात मीठ जास्‍त झाल्‍याने हॉटेल मालकाचे क्रुर कृत्‍य; दोन महिन्‍यानंतर झाला उलगडा

जेवनात मीठ जास्‍त झाल्‍याने हॉटेल मालकाचे क्रुर कृत्‍य; दोन महिन्‍यानंतर झाला उलगडा

गोपाल मोटघरे

पिंपरी : जेवनात मीठ जास्त झाले, ह्या किरकोळ कारणावरून ढाबा चालकाने आपल्या आचाऱ्याचा खून केला आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील चाकण (Police) पोलीसस्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेल पिंपळगाव या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. (Breaking Marathi News)

प्रेसनजीत गोराई (वय 35, मुळ राहणार पश्चिम बंगाल) असे खून (Crime News) झालेल्या आचाऱ्याचे नाव आहे. प्रेसनजित गोराई हा शेल पिंपळगाव येथील ओंकार ढाबा या ठिकाणी आचारी म्हणून काम करत होता. 26 ऑक्टोबर 2022 ला ढाब्यात स्वयंपाक करत असताना त्याच्याकडून चुकून जेवनात मीठ जास्त पडले. याच कारणावरून ढाबाचालक ओमकार अण्णाराव केंद्रे आणि कैलास अण्णाराव केंद्रे यांनी त्याला लोखंडी पाईप, लोखंडी रॉड आणि वायरणे बेदम मारहाण करत त्याचा खून केला.

दोन दिवसानंतर लावली मृतदेहाची विल्‍हेवाट

खून केल्यानंतर दोन दिवस केंद्रे बंधूंनी त्याचा मृतदेह स्वतःच्या ढाब्यातच लपवून ठेवला. त्याच्यानंतर प्रेस्नजित गोराई ढाब्यापासून काही अंतरावर असलेल्या एका खड्ड्यात टाकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बातमी पोलिसांना खबऱ्या मार्फत कळताच दोन महिन्यानंतर पोलिसांनी प्रेसनजीत गोराई यांच्या खुनाचा छडा लावला आहे. ओंकार केंद्रे आणि कैलास केंद्रे या दोन्ही भावंडांना शस्त्र विरोधी पथकाने खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Bus Accident: चंद्रपूर-यवतमाळ रोडवर बस-ट्रकचा भीषण अपघात; बसच्या ड्रायव्हर साईटचा चेंदामेंदा,थराकाप उडवणारा|Video Viral

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेची मोठी घोषणा; १३ प्रमुख स्टेशनवर महत्वाचा निर्णय लागू, जाणून घ्या सविस्तर

सरकारी कार्यालयात 'भ्रष्टाचार' कमी झाला, महायुती सरकारच्या उपाययोजना किती प्रभावी?

Maharashtra Live News Update: पुण्यातील विद्यार्थी दिल्ली विमानतळावर अडकले

Friday Horoscope : वरिष्ठांच्या आशीर्वादाने यश मिळेल; आजचा दिवस ठरणार ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT