Pimpri Chinchwad Crime Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Crime : स्वयंपाक करण्यावरून चिडला, मध्यरात्री तो लोखंडी रॉड घेऊन आला अन्...VIDEO बघून थरकाप उडेल!

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडमधील काळभोरनगर येथील वीकेवी आटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ही धक्कादायक घटना २ नोव्हेंबरला रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिपंरी चिंचवड शहरातील काळभोरनगर परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत कामावर असलेल्या दोन कामगारांमध्ये किरकोळ वाद झाला होता. दरम्यान या किरकोळ वादातून एका कामगाराने झोपलेल्या दुसऱ्या कामगारावर लोखंडी रॉडने वार करून त्याचा खून केला आहे. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) काळभोरनगर येथील वीकेवी आटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ही धक्कादायक घटना २ नोव्हेंबरला रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. ह्या दुर्दैवी घटनेत दिपू कुमार (वय १९) या तरुणाचा लोखंडी रॉडने वार करून करण्यात आला आहे. दीपू कुमारचा मित्र मुकेश हिरा कुशवाह ह्याने त्याचा लोखंडी रॉडने वार करून खून केला आहे. मध्यरात्रीनंतर झोपलेल्या दिपू कुमार याच्या डोक्यावर मुकेशने (Crime News) जोरदार वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात 

दरम्यान कंपनीत जेवण बनवण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. डोक्यात राग ठेवून मुकेश कुशवाहने दिपू कुमारचा लोखंडी रॉडने वार करून खून केला आहे. या प्रकरणात पिपंरी पोलिसांनी मुकेश हीरा कुशवाह या आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भास्कर जाधव यांची विधानसभा गटनेते पदी नियुक्ती

WTC Points Table : टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करताच WTC पॉइंट टेबलमध्ये मोठा उलटफेर

Gulkand: गुलकंदापासून बनवा 'हा' खास पदार्थ, पाहता क्षणी तोंडाला सुटेल पाणी

Laxman Hake: नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी

Almonds: तुम्ही बदाम जास्त प्रमाणात खाता का? तर आरोग्यावर होऊ शकतात दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT