यवतमाळमध्ये पेट्रोलचे दर पुन्हा भडकले Saam tv
महाराष्ट्र

यवतमाळमध्ये पेट्रोलचे दर पुन्हा भडकले

परकीय चलन दरासह आंतरराष्टीय बाजारात कच्या तेलाच्या किमतीच्या आधारे दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसाद नायगावकर

यवतमाळ :  पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने भाववाढ होताना दिसत आहे . सद्या यवतमाळ येथे पेट्रोलचा दर हा १०५.७६   रुपये  डिझेलचा दर हा ९६,१२  रुपये  इतका आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. आज पेट्रोलचे दर हे ३४   पैशानी तर डिझेलचे दर हे  २५ पैशानी महागले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात रोज सकाळी ६ वाजता बदल होत असतो.

सकाळी ६ वाजताच नवे दर लागू होत असतात. परकीय चलन दरासह आंतरराष्टीय बाजारात कच्या तेलाच्या किमती काय आहे यानुसार रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होतो . रोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे मात्र सर्वसामान्यांचे मात्र कंबरडं मोडलं आहे.

सद्या शेतीचे कामे चालू आहेत .मजुरी परवडणारी नसल्याने शेतकरी सर्व कामे यांत्रिकी पद्धतीने करतात. जेंव्हा वीज नसते तेंव्हा उन्हाळी पिकांना डिझेलच्या पंपाने शेतीत पाणी टाकले जाते. अशातच डिझेलचे भाव सातत्याने वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावल्या गेले. अशा स्थितीत केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलची  ज्या पद्धतीने दरवाढ केली आहे ही क्रूर थट्टाच  म्हणावी लागेल.

Edited By- Annuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Traffic Alert : ठाणे - घोडबंदर मार्ग पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

Maharashtra Live News Update: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

SCROLL FOR NEXT