Petrol Diesel Latest Price Saam tv
महाराष्ट्र

Petrol Diesel Price : खुशखबर! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

महाराष्ट्रात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 66 पैशांनी कमी झाले आहे. पेट्रोल पाठोपाठ डिझेलच्या दरातही 64 पैशांची घसरण झाली आहे.

Satish Daud

Petrol-Diesel Price Today 26th November : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने खाली उतरल्या आहेत. कच्च्या तेलाचे (Crud Oil)  दर गेल्या 7 महिन्यातील निचांकी स्तरावर पोहोचले आहेत. आज ब्रेंट क्रूड ऑइल 83.63 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यापार करत आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमी होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. (Petrol Diesel Price Today in Mumbai Maharastra)

हिमाचल प्रदेशात पेट्रोल 0.68 पैशांनी महागले असून पेट्रोलचा भाव प्रतिलिटर 95.74 रुपयांवर पोहचला आहे. त्याचवेळी डिझेल 0.58 पैशांनी वाढून 81.99 रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात किरकोळ वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल झालं स्वस्त

दुसरीकडे, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 66 पैशांनी कमी झाले आहे. पेट्रोल पाठोपाठ डिझेलच्या दरातही 64 पैशांची घसरण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर प्रतिलिटर 105.96 रुपये आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 92.49 रुपयांवर आले आहेत. (Latest Marathi News)

महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थानमध्येही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. राजस्थानमध्ये पेट्रोल 0.53 रुपयांनी तर डिझेल 0.48 रुपयांनी स्वस्त झाले आहे. दोन्हीच्या किमती अनुक्रमे 10.8.07 रुपये प्रति लिटर आणि 93.35 रुपये प्रति लिटर आहेत. देशातील 4 महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

देशातील चार प्रमुख महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonu Sood : सोनू सूदचा दिलदारपणा! सोलापूरकरांसाठी धावला; पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात, पाहा VIDEO

Auspicious Yog: दुर्गा अष्टमी आणि दोन शुभ योगांचा संगम; या 4 राशींवर लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद

Airtel Festival Offer: भन्नाट ऑफर! एअरटेलचा नवा रिचार्ज प्लॅन, मिळेल २० ओटीटी प्लॅटफॉर्म अन् ५जी डेटा मोफत

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या KYC वर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, सरकारचा पैसा...

SCROLL FOR NEXT