PM Narendra Modi Sabha  Saam Tv
महाराष्ट्र

PM Narendra Modi : दिल्ली उच्च न्यायालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात याचिका; आज होणार सुनावणी

Lok Sabha Election : मोदी धार्मिक वक्तव्य करतात, देवाच्या नावाने आणि पूजा स्थळाच्या नावाने मत मागतात म्हणून त्यांच्यावर ६ वर्ष निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात यावी अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

प्रमोद जगताप

दिल्ली उच्च न्यायालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात १५ एप्रिल रोजी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज महत्वापूर्ण सुनावणी पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

आनंद जोंधळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. मोदी धार्मिक वक्तव्य करतात, देवाच्या नावाने आणि पूजा स्थळाच्या नावाने मत मागतात म्हणून त्यांच्यावर ६ वर्ष निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात यावी अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कलम १५३ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा आणि लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार मोदी यांच्यावर ६ वर्षे निवडणूक लढण्यास अपात्र करावं अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

वकील आनंद जोंधळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायमुर्ती सचिन दत्ता यांच्यासमोर आज दिल्ली उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. कोर्ट ही याचिका स्वीकारते की फेटाळते हे आज समजणार आहे.

काय म्हटलंय याचिकेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ९ एप्रिलला उत्तर प्रदेशात केलेल्या भाषणात हिंदू आणि शीख गुरूंच्या नावाने मते मागितली. तसेच पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांना मुस्लिमांशी जोडले. असे करणे म्हणजे लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन होय. पंतप्रधान मोदींना निवडणुकीसाठी अपात्र घोषित करा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामुळे लोकसभा निवडणुकीत मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन पंतप्रधानांवर कारवाई करावी, असंही याचिकाकर्त्यांने म्हटलं आहे.

पंतप्रधान विमानाने देशभर फिरत आहेत आणि अशी भाषणे करत आहेत, ज्यामुळे एखाद्या समुदायाविरुद्ध द्वेषाचे वातावरण निर्माण होऊ शकते. देशभरात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी अशा भाषणांवर बंदी घातली पाहिजे, असे आरोप करत मोदींविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT