फायर ऑडिट करून घ्या अन्यथा खासगी हॉस्पिटलची मान्यता रद्द केली जाईल! SaamTvNews
महाराष्ट्र

फायर ऑडिट करून घ्या अन्यथा खासगी हॉस्पिटलची मान्यता रद्द केली जाईल!

भंडारा आणि अहमदनगर दुर्घटनेनंतर बीडची आरोग्य यंत्रणा अलर्टवर

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटलने फायर ऑडिट करून घ्यावे, अन्यथा त्यांची मान्यता रद्द केली जाईल. असे पत्र बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी काढले आहे. अहमदनगर आणि भंडारा येथील अग्निकांडानंतर बीड जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

हे देखील पहा :

बीड मधील सर्व आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रॉनिक ऑडिट करायला सांगितले असून पुढील 10 दिवसाची मुदत दिली आहे. अन्यथा कारवाई केली जाईल असे डॉ.सुरेश साबळे यांनी सांगितलंय. दोन दिवस बीड जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना आग लागल्यानंतर ती आटोक्यात आणण्यासाठीचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले आहे.

त्यामुळे आरोग्य विभागात सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे, डॉ.सुरेश साबळे यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील सर्व खासगी हॉस्पिटलचे देखील फायर ऑडिट महत्वाचे आहे. ते पूर्ण करून घेण्यासाठी 15 दिवसाची मुदत दिली आहे. अन्यथा हॉस्पिटल चे परवाने रद्द केले जातील व नूतनीकरण केले जाणार नाही.असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यातील पाऊस झाला कमी, विदर्भाला येलो अलर्ट

GK: त्सुनामी म्हणजे काय आणि ती इतकी घातक का असते? जाणून घ्या माहिती

Crime News : दुचाकीवरून आले, तरुणीला उचलून नेलं अन्...; धक्कादायक कारण आलं समोर, घटनेचा VIDEO व्हायरल

लालपरीतून ओलाचिंब प्रवास; बसमध्येच पावसाचं पाणी गळायला लागल्याने चालकावर प्रवाशांने धरली छत्री

Tariff: वस्त्रोद्योग, हिरे, दागिने अन् बरंच काही; टॅरिफचा भारताला बसणार फटका; या क्षेत्रांवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT