Buldhana Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana: भर उन्हाळ्यात विजेच्या लपंडावामुळे नागरीक त्रस्त, स्वत:ला जाळून घेण्याचा इशारा

घरात विजेचा लपंडाव सुरु असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा: कडक उन्हाळा सुरु झालाय. तापमानातही मोठी वाढ होत असल्याने नागरिक घरात राहणे पसंत करीत आहे. मात्र, घरात विजेचा लपंडाव सुरु असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत (People suffering due to power cut protest at power distribution company Malkapur).

मलकापूर शहरातील नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यलयावर धडक देत वीज सुरळीत करा अन्यथा अंगावर पेट्रोल घेऊन जाळून घेऊ, असा इशारा वीज अभियंत्याला दिलाय. या इशाऱ्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

विजेच्या (Electricity) लपंडावामुळे त्रस्त झाल्याने हाश्मी नगर, मिल्लत नगर, फकीर पुरा, भागातील नागरिकांनी डॉ.सलीम कुरेशी, रईस जमादार जावेद कुरेशी यांच्या नेतृत्वात मलकापूर येथील वीज वितरण कार्यालयावर मोर्चा (Morcha) काढला. आमच्या मागण्या दोन दिवसात पूर्ण न झाल्यास आम्ही स्वतःवर पेट्रोल ओतून जाळून घेऊ, असा इशारा नागरिकांनी उपविभागीय कार्यकारी अभियंता यांना दिला आहे.

मलकापूर (Malkapur) शहरात 100 व्हॅट डीपीच्या ओव्हरलोडिंगमुळे डीपी जळत आहेत. त्यामुळे विविध भागातील रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु असून उपवासाचे दिवस सुरु आहे. असे असताना मलकापुर वीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे येथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याकरिता हाश्मी नगर, मिल्लत नगर, फकीर पुरा भागातील नागरीक एकत्र होऊन मलकापूर वीज वितरण कार्यालयावर धडकले. त्यांनी उपविभागीय अभियंता यांच्यासमोर होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला. तर, मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांनीही उपविभागीय अभियंता यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. त्या ठिकाणी 200 व्हॅटची डीपी बसवा अशी सूचना उपविभागीय अभियंता यांना दिली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

SCROLL FOR NEXT