Dilip Walse Patil saam tv
महाराष्ट्र

नागरिकांनी शांतता राखावी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आवाहन

भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : प्रेषित पैंगबर मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणावरून भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात मुस्लिम बांधवांकडून राज्यभरात जोरदार निदर्शने सुरू आहेत. यावेळी निदर्शकांकडून नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेची (Arrest) मागणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse patil) यांनी ट्विटरवरुन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

गृहमंत्री पाटील यांनी ट्विटरवर आवाहन करत म्हटलंय, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणावर मुस्लिम जनसमूदाय आज विविध ठिकाणी रस्त्यावर उतरला आहे. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या आहेत.

नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाची व त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची गंभीर दखल राज्य शासन व गृह विभागाने घेतली असून पोलिसांचा तपास सुरु आहे. सर्वांनी शांतता पाळावी,राज्यात कुठेही कायदा,सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, भाजपचे प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. भाजपच्या व्यक्तीनं केलेलं वक्तव्य बालिशपणाचे असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करतील. भाजपने केलेली कारवाई ही कमी असू शकते, त्यामुळे लोकांचा रोष स्वाभाविक आहे.

पण हिंदू असो की, मुस्लिम सगळ्यांनी शांतता ठेवावी. संयम ठेवावा असे आवाहन राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. लवकरच राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल. तसेच राज्य सरकारने आरक्षणाची तारीख जाहीर केली असली, तरी ती काही निवडणुकीची तारीख नाही, इंपेरिकल डेटा गोळा करण्याचे काम सुरु आहे, लवकरच ते पूर्ण होईल असे छगन भुजबळ म्हणाले.

Edited by - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT