ozarde waterfall, lingmala waterfall, satara rain, mahabaleshwar  saam tv
महाराष्ट्र

Satara Waterfalls : सातारा जिल्ह्यात 'या' धबधब्यांवर जाण्यास बंदी; पर्यटकांची घाेर निराशा

mahabaleshwar points closed for tourisits : या निर्णयामुळे पर्यटकांची निराशा हाेत आहे.

Siddharth Latkar

संभाजी थाेरात / ओंकार कदम

Satara Rain Updates : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ओझर्डे धबधबा तसेच महाबळेश्वर नजीकच्या लिंगमळा धबधबा येथे पर्यटनास तात्पूरती बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बंदी असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. (Maharashtra News)

पावसाळा (rain) सुरू झाला की लोकांना वेध लागतात ते पश्चिम घाटातल्या धबधब्याचे. सातारा जिल्ह्यात असे अनेक धबधबे कोसळू लागले आहेत. त्यातील प्रसिद्ध धबधबा म्हणजे कोयना धरण (koyna dam) परिसरातला ओझर्डे धबधबा. हा धबधबा कोसळू लागला आहे. हा फेसाळणारा धबधबा पाहणं म्हणजे सुखद अनुभव असतो. मात्र हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांना थोडी वाट बघायला लागणार आहे.

अतिवृष्टीमुळे सध्या पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत पुन्हा हा धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल.

गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या भागाचे सौंदर्य खुलायला सुरवात झाली आहे. गेल्या तीन दिवसात या भागात 665 मिलीमीटर येवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या भागातील डोंगर दर्यांमधून खळखळत वाहणा-या आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या लिंगमळा धबधब्याचे मनमोहक पण अक्राळ विक्राळ रूप आता पाहायला मिळत आहे.

पावसाची सरासरी जास्त असल्याने आता महाबळेश्वर परिसरातील पर्यटन स्थळांवर प्रशासनाकडून पर्यटकांना जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासनाने पर्यटनस्थळे तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवली आहेत. त्यामुळे पर्यटकांची निराशा हाेत आहे.

दरम्यान सातारा जिल्हा प्रशासनाने दाेन दिवस यवतेश्वर घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने पर्यटकांना एकीव धबधबा पाहण्यासाठी जाता येणार नसल्याने सातारकरांची निराशा झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT