pensioners protest demanding minimum pension to rs 7500 saam tv
महाराष्ट्र

EPS 95 पेन्शनधारकांचा धुळे, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा

Lok Sabha Election 2024 : आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यमान सरकारला असंतोषाचा सामना करावा लागेल असा इशारा आंदोलकांनी दिला.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी / भूषण अहिरे

Andolan :

पेन्शन वाढीच्या मागणीसाठी गेल्या आठ वर्षांपासून लढा देणा-या पेन्शनधारकांचा भ्रम निरास झाल्याने आज (साेमवार) पुन्हा एकदा पेन्शनधारकांनी राज्यभरात आंदाेलनास प्रारंभ केला आहे. धुळे आणि नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने पेन्शन धारकांतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या क्युमाईन क्लब या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पेन्शन संदर्भातील मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदाेलन असल्याचे उपोषणकर्त्यांनी नमूद केले. या लाक्षणिक उपोषणामध्ये मोठ्या संख्येने पेन्शन धारक सहभागी झाले हाेते. यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात पेन्शन धारकांनी घोषणाबाजी केली.

पेन्शन वाढीच्या मागणीसाठी गेल्या आठ वर्षांपासून ईपीएस पेन्शनधारक लढा देत आहेत. पेन्शन वाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याने पेन्शनधारकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. (Maharashtra News)

श्रम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयाच्या टोलवाटोलवीमुळे पेन्शधारकांची पदरी पुन्हा निराशा निर्माण झाली. येत्या 13 मार्चला होणाऱ्या केंद्रीय मंत्रालयाच्या बैठकीत पेन्शन वाढीचा प्रश्न सोडवला गेला नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यमान सरकारला असंतोषाचा सामना करावा लागेल असा इशारा आंदोलकांनी दिला. या आंदोलनात मोठ्या संख्येने पेन्शनधारक सहभागी झाले होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

Shocking : खिशात पैसा नाही, मुलांसाठी दिवाळीत कपडे अन् फराळ कुठून आणू?, चिंतेतून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

Virat Kohli: विराट पुन्हा शून्यावर आऊट; एडिलेड वनडेनंतर घेणार निवृत्ती? विकेटनंतर क्राऊडला केलेल्या इशाऱ्यामुळे चर्चांना उधाण

BSNL कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी "सम्मान प्लॅन" लाँच, वर्षभरासाठी दररोज २ जीबी डेटा आणि कॉलिंग; किंमत किती?

Box Office Collection: 'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियात'मध्ये काटे की टक्कर; तिकिट खिडकीवर कोणी मारली बाजी?

SCROLL FOR NEXT