Parliament Winter Session 2023 ncp mp Supriya Sule Criticizes Modi Government After Suspended Gp98  saam tv
महाराष्ट्र

Supriya Sule News: 'ही अघोषित आणीबाणी, जनतेचा आवाज दडपण्याचे पाप...' निलंबनानंतर सुप्रिया सुळेंचा संताप

Supriya Sule Reaction on Parliament Suspension: बेरोजगारांची घुसमट, महिला-मध्यमवर्गीयांचे प्रश्न या सरकारला ऐकायचेच नसतील तर ते मांडायचेच नाहीत का? असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

Gangappa Pujari

Parliament MP Suspended:

संसदेतील घुसखोरीनंतर लोकसभेत खासदारांच्या निलंबनाचे सत्र सुरू झाले आहे. संसद सुरक्षेच्या कारणावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर निलंबनाची कारवाई केली जात आहे. काल ३३ खासदारांचे निलंबन केल्यानंतर आज पुन्हा तब्बल ४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

आज (मंगळवार, १९ डिसेंबर) निलंबन केलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. या कारवाईनंतर सुप्रिया सुळे यांनी एक्स सोशल मीडिया माध्यमावर (ट्वीटर) पोस्ट करत केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे?

"दुष्काळ आणि सरकारच्या धोरणांमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कांदा-कापूस-सोयाबीन-दूधाच्या दरांचा प्रश्न सरकारला विचारायचा नाही, तर कुणाला विचारायचा? शेतकऱ्यांचं म्हणणं जर सरकारपर्यंत मांडायचंच नसेल, बेरोजगारांची घुसमट सरकारला ऐकायचीच नसेल, महिला-मध्यमवर्गीयांचे प्रश्न या सरकारला ऐकायचेच नसतील तर ते मांडायचेच नाहीत का? आणि जर हे प्रश्न मांडले तर ते सभागृहातून बाहेर काढतात..." असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विचारला आहे.

गंभीर आरोप....

"संसदेच्या सुरक्षेत (Parliament Security) नेमकी काय चूक झाली? याबद्दल प्रश्न विचारणे भाजपाच्या (BJP) राज्यामध्ये गुन्हा आहे का? हा प्रश्न विचारणाऱ्या १४१ खासदारांना माननीय लोकसभा अध्यक्षांनी निलंबित केले आहे. भाजपा सरकारने आज माझ्यासह आणखी ४९ खासदारांना संसदेतून निलंबित केले. सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहे हे स्पष्ट आहे. तसेच काही महत्वाच्या विधेयकांना चर्चेविनाच मंजूर करण्याचा भाजपाचा डाव आहे..." असा गंभीर आरोपही सुप्रिया सुळेंनी केले आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जनतेचा आवाज दडपण्याचे पाप...

तसेच "सरकारमध्ये विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची हिंमत नाही. त्यांनी त्यांना सभागृहातूनच निलंबित करण्याचा सोपा मार्ग निवडला. म्हणजे ही अघोषित आणिबाणी आहे. जनतेचा आवाज दडपण्याचे पाप हे सरकार करतंय आणि म्हणूनच आम्ही सर्वजण या दडपशाहीच्या विरोधात ठामपणे एकजूटीने उभे आहोत..." अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT