Maratha Aarkshan Saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarkshan : सगेसोयरे अंमलबजावणी होत नसल्याने तरुणाने संपविले जीवन

राजेश काटकर

परभणी : राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या सगेसोयरे अध्यादेशची अजून (Parbhani) अंमलबजावणी होत नाही. यामुळे तरुणाने टोकाचे पाऊल उचलत हातावर व पायावर लिहून झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. हि घटना (Jintur) जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा येथे घडली आहे.  (Maharashtra News)

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा येथील वैभव लिंबाजीराव बोराडे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. वैभव बोराडे हा युवक मराठा समाजाच्या आरक्षण (Maratha Aarkshan) आंदोलनात सक्रिय सहभागी होता. यामुळे आपल्या समजाला आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करत असे. यातच राज्य सरकारकडून सगे- सोयरे कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी होती. मात्र राज्य सरकारकडून यास विलंब होत असल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने होत (Maratha Reservation) नसल्याने आपण स्वतःचे जीवन संपवत असल्याचे हाता-पायावर लिहून वैभव याने शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे सपोनी प्रभाकर कापुरे, पोलीस हवालदार वसंत वाघमारे, सुनीलकुमार वासलवार,अमलदार शेख जीलानी यांनी घटनास्थळी पंचनामा केला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fast Benefits: उत्तम आरोग्यासठी उपवास आहे 'वरदान'

Diwali: दिवाळीचा घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने;होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

SCROLL FOR NEXT