Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: तरुणाची गळफास लावून आत्महत्या; इंजिनिअरींगला प्रवेश न मिळाल्‍याने होता निराश

तरुणाची गळफास लावून आत्महत्या; इंजिनिअरींगला प्रवेश न मिळाल्‍याने होता निराश

राजेश काटकर

परभणी : जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील 19 वर्षीय तरुणाने घरात वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस (Parbhani) आली. नैराश्येतून आत्महत्या केल्‍याचा अंदाज वर्तविला जात आहे. (Live Marathi News)

चारठाणा येथील डॉ. बालासाहेब शर्मा यांचा मुलगा तुषार शर्मा (वय 19) हा मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत झोपण्यासाठी गेला होता. परंतु, बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत खोलीमधून तो बाहेर आला नाही. यामुळे घरच्या मंडळीने वरच्या मजल्यावर जाऊन खोलीचे दार ठोठावले. परंतु, आतमधून कुठल्याच प्रतिसाद मिळत नसल्याने घरच्या मंडळींनी खोलीमध्ये प्रवेश केला असता संबंधित तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची बाब निर्दशनास आले. याबाबतची माहितीदिल्यावर चारठाणा (Police) पोलिसानी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात (Hospital) पाठविण्यात आला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले.

नैराश्‍येतून आत्‍महत्‍या?

सदर तरुण हा दोनच दिवसांपूर्वी तंत्रनिकेतनला इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी नागपुर येथे गेला होता. परंतु, प्रवेश मिळाला नसल्याने त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी; असा कयास बांधला जात आहे. दरम्यान, सदर घटनेप्रकरणी चारठाणा ठाण्यात रात्रीपर्यंत कुठल्याच प्रकारची नोंद नसल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सौरमालेतील कोणत्या ग्रहावर दिवस सर्वात मोठा असतो?

Maharashtra Politics : भाजपच्या ऑपरेशन लोटसला ब्रेक लावण्यासाठी अजित पवारांची मोठी खेळी; थेट मंत्री मैदानात उतरवला

राग आल्यानंतर चेहऱ्याचा रंग लाल का होतो?

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

६० लिटर पाण्यात ९०० किमी धावणार कार? इराणच्या वैज्ञानिकाचा व्हिडिओ व्हायरल, वाचा नेमकं सत्य काय

SCROLL FOR NEXT