Parbhani News  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Band : बंदचा फटका, भाजीपाल्याचे भाव पडले; ग्राहक नसल्याने भाजीपाला फेकून देण्याची वेळ

Parbhani News : शेतकरी आपला भाजीपाला स्वतः विकत आहेत; त्यांची परिस्थिती हीच आहे. यामुळे विक्रीसाठी आणलेला खर्च देखील निघाला नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

राजेश काटकर

परभणी : भाजीमंडईत शेतकऱ्यांनी शेतातून काढलेला भाजीपाला आज सकाळी विक्रीसाठी आणला. मात्र (Parbhani) परभणी जिल्ह्यात भाजीपाल्याचे भाव पडले असून विक्रीसाठी आणलेला भाजीपाला कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना (Farmer) विकावा लागत आहे. तर काहींनी नाईलाजास्तव भाजीपाला परत नेला. (Tajya Batmya)

शेतात लागवड केलेला भाजीपाला (Vegetable) आज सकाळी शेतकऱ्यांनी भाजीमंडईत विक्रीसाठी आणला होता. येथे आणल्यानंतर मात्र मेथीची जूडी, कोथिंबीर जुडी कवडीमोल भावात म्हणजे केवळ १ रुपयाला विक्रीला गेली. तर भेंडी, गोबी १० रुपये किलो, टमाटे ४ ते ५ रुपये किलो असा भाव बीटामध्ये मिळाला. जे शेतकरी आपला भाजीपाला स्वतः विकत आहेत; त्यांची परिस्थिती हीच आहे. यामुळे विक्रीसाठी आणलेला खर्च देखील निघाला नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षणासाठी आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा फटका बसत असल्याचे चित्र परभणीत पाहावयास मिळत आहे. परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद आहे. आज बंद असल्याने ग्राहक देखील भाजी मंडईत नसल्याने बाजारात शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. ग्राहक नसल्याने भाजीपाला फेकून किंवा परत न्यावा लागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT