Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: महिलांच्‍या लढ्याला अखेर यश; ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर

महिलांच्‍या लढ्याला अखेर यश; ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर

राजेश काटकर

परभणी : गावात दारूबंदीसाठी आक्रमक झालेल्या महिलांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. परभणी (Parbhani) तालुक्यातील साळापुरी या ग्रामपंचायतीमध्ये (Grampanchayat) सोमवारी झालेल्या ग्रामसभेत एकमताने दारूबंदीविरुद्धचा ठराव मंजूर करण्यात आला. (Live Marathi News)

परभणी तालुक्‍यातील साळापुरी गावातील महिलांच्या लढ्यामुळे गावात बाटली आडवी झाली आहे. परभणी तालुक्यातील साळापुरी येथे मोठ्या प्रमाणावर अवैद्य दारू विक्री होत आहे. त्यामुळे गावातील तरुणांसह आबाल वृद्धांमध्ये देखील दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. या दारूमुळे अनेकांचे संसार देखील उध्वस्त होत होते. त्यामुळे गावातील महिलांनी एकजूट करून ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला होता.

अन्‌ ग्रामसभेत ठराव

महिलांचा विरोध लक्षात घेता सोमवारी झालेल्या ग्रामसभेमध्ये एकमताने गावातील (Liquor Ban) दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. महिलांच्या पुढाकारामुळे येणाऱ्या काळात या गावातील दारूमुळे उध्वस्त होणाऱ्या कुटुंबाचे प्रमाण कमी होईल हीच अपेक्षा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : ६ राशींची होणार चांदी; कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Saree Colour Tips: साडीत दिसाल एकदम स्लिम अन् गॉर्जियस! बॉलिवूड अभिनेत्री फॉलो करतात हा सिक्रेट कलर फॉर्म्युला

8th Pay Commission : 3.83 किंवा 4.0 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास किती वाढेल पगार? जाणून घ्या गणित

BJP Leader: भाजप नेत्याच्या ताफ्यावर हल्ला, दगड-अंडी फेकल्याचा आरोप; राजकारणात खळबळ

Dalimb Fruit: डाळिंब आहे अत्यंत गुणकारी; शरीराला कोणते पाच फायदे मिळतात?

SCROLL FOR NEXT