Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Parbhani News : रंगनाथराव दहिफळे यांचे कुटुंब आहे. त्यांना ३ मुले आणि १ मुलगी असा मोठा परिवार आहे. त्यांच्यातील मोठा मुलगा डॉ. बाळासाहेब व लहान मुलगा प्रा. युवराज हे दोघेही प्राध्यापक. तर मधवा मुलगा केशव हे शेती करतात

Rajesh Sonwane

विशाल शिंदे 
परभणी
: भावाभावांमध्ये आजही हिस्से वाटणीवरून वाद तसेच शेतीच्या बांधावरून भांडण, मारामाऱ्या वेळ पडली तर एकमेकांचा जीव देखील घेतल्याचे पाहण्यास मिळत असते. मात्र काही बोटावर मोजण्या इतके असेही कुटुंब आहेत कि जे जमिनी पेक्षा नात्याला मानतात. अशाच परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील दहिफळे बंधूंनी शेत वाटणी करताना एक आदर्श घालून दिला. ज्याची चर्चा राज्यभरात होत आहे. 

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथील रंगनाथराव दहिफळे यांचे कुटुंब आहे. त्यांना ३ मुले आणि १ मुलगी असा मोठा परिवार आहे. त्यांच्यातील मोठा मुलगा डॉ. बाळासाहेब व लहान मुलगा प्रा. युवराज हे दोघेही प्राध्यापक आहेत. तर मधवा मुलगा केशव हे शेती करतात. यात गावाकडे वडिलांची एकूण साडेसोळा एकर जमीन असून गावात घर, जागा असा प्रपंच आहे. यात ९१ व्या वर्षी डोळ्यासमोर हिस्से वाटणी व्हावी; अशी इच्छा वडिलांनी व्यक्त केली. 

प्राध्यापक भावांनी घेतला कमी हिस्सा 

त्यानुसार तिन्ही भाऊ आणि त्यांच्या पत्नी, बहीण असे सर्वानी घरच्या घरीच बसून वाटण्या केल्या. ज्यात दोन्ही प्राध्यपक भावांनी स्वतःला नोकरी असल्याने शेतीत राहणाऱ्या भावाला एकून १६.५ एकर जमिनी पैकी ९.५ एकर जमीन दिली. तर दोन्ही भावांनी स्वतः ३- ३ एकर जमीन ठेवली. एवढेच नाही तर शेतकरी भावाच्या मुलांचे शिक्षण आणि लग्नाची जबाबदार देखील घेतली आहे. कुठलाही वाद विवाद न घालता अतिशय आनंदात हे सर्व घडले आहे. 

विहीर, बोअर असलेली जमीन दिली 

साडे सोळा एकर मधील जी ९.५ एकर जमीन मधवा भाऊ केशव दहिफळे यांच्या वाटणीला आली. ती जमीन पूर्णतः पाण्याखाली असुन २ विहीर आणि बोअर शेतात आहे. शिवाय साडे नऊ एकरमधली आंबराई हि त्यांच्या हक्कात आली. तसेच मुलगा आणि मुलीचे शिक्षण आणि लग्न हि नोकरदार भाऊच करणार असल्याने केशव आणि त्यांच्या पत्नीचा आनंद गगनात मावेनासा झाला.

महिलांचीही सहमती 
सध्याच्या वातावरणात एकत्रित कुटुंब पद्धती हि खुप कमी राहिली आहे. त्यात दहिफळे कुटुंबाने एकत्रित कुटुंब पद्धती तर जपलीच शिवाय नात्यातील गोडवा हि कायम ठेवला आहे. एवढा मोठा निर्णय घेताना घरातील महिलांचे विचार जुळणे हे अत्यंत महत्वाचे असते. दहिफळे कुटुंबियातील महिलांनीही या निर्णयाला हसत हसत पाठींबा दिला. आमच्या कुटुंबात आम्ही बहिणीसारखे राहतो आणि जे काही निर्णय घ्यायचे; ते सर्व जण मिळून घेतो असे तिन्ही जावा सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT