Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: खेळता- खेळता चार वर्षीय बालक पडला बोअरवेलच्या खड्ड्यात

Parbhani News खेळता- खेळता चार वर्षीय बालक पडला बोअरवेलच्या खड्ड्यात

राजेश काटकर

परभणी : खेळात असतांना चार वर्षीय बालक बॊअरवेलच्या खड्ड्यात पडला. मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथील सुनील दगडू यांच्या शेतात (सर्व्हे नं. 96) हि घटना घडली असून बालकाला (Parbhani) वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. (Breaking Marathi News)

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील उक्कलगाव शिवारात सर्व्हे नं ९६ मध्ये सुनील दगडू यांचे शेत आहे. आज सकाळी उक्कलगाव येथील उक्कलकर हे त्यांच्या सोहम सुरेश उक्कलकर या चार वर्षीय नातवासह शेतकाम करण्यासाठी गेले होते. यावेळी शेतात खेळताना दुपारी एकच्या सुमारास सोहमचे बाहुले (NDRF) बोअरवेलच्या खड्ड्यात पडले. ते काढण्यासाठी वाकून बघत असताना सोहम उक्कलकर हा खड्डयात पडला. परिसरातील शेतमजूर जमा झाले. सोहम अंदाजे पंधरा फुट खोल पडला व अडकून पडला. श्वासोच्छवास चालू असल्याने त्याच्या जीवास धोका झाला नाही.

बचावकार्य सुरु 

घटनेची माहिती कळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. आरोग्य विभागाने खड्डयात ऑक्सिजनची नळी सोडली असून त्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवला जात आहे. बालकाचे पालक त्याच्याशी बोलत असून त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तब्बल साडेचार तासानंतरही एनडीआरएफचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले नाही. घटना घडून गेल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे कार्यालयीन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जेसीबीच्या सहाय्याने खड्डयाच्या आजूबाजूची माती काढण्यास सुरु करण्यात आली असून दहा फूटापर्यंत खड्डा खोदण्यात आला आहे. मात्र साडेचार वाजेपर्यंत एनडीआरएफचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

Maharashtra Live News Update: आमदार चिखलीकर यांना भविष्यात मोठी जवाबदारी मिळणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले संकेत

भाजपप्रणित NDA ला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT